भारतीय संविधानाने दिलेल्या हक्का मुळेच मी पोलीस कॉन्स्टेबल झाली मंगल गावित
कल्याण ,कुणाल म्हात्रे : पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे अध्यक्ष पि .टी. धनविजय, कोरोना योद्धा पोलीस कॉन्स्टेबल मंगल गावित, मालती ठाकरे उपस्थित होते.
मंगल गावित आपल्या भाषणात म्हणाल्या इतर देशांपेक्षा आपल्या भारताचे संविधान नक्कीच चांगले आहे. प्रत्येक नागरिकाला न्याय हक्क देण्यात आलेला आहे. मी संविधानामुळेच पोलीस कॉन्स्टेबल होऊ शकली. कोरोना चा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नाही शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे प्रत्येकाने पालन करायला पाहिजे आपण आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन दुसऱ्याची काळजी घ्या. कोरोना योद्धा म्हणून सम्राट अशोक शाळेने मला प्रमुख मान्यवर म्हणून बोलावून सन्मान दिला त्यांचे मी आभारी आहे.
एकाच वेळी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन संविधान प्रास्ताविका चे वाचन केले. कार्यक्रमाप्रसंगी शिक्षकांसह माध्यमिक मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका सुजाता नलावडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुंबई २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली सूत्रसंचालन व आभार गणेश पाटील यांनी केले.

Post a Comment