डोंबिवलीत स्व.इंदिरा गांधी जयंती साजरी
डोंबिवली , शंकर जाधव : भारताची पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची डोंबिवली जयंती साजरी झाली. डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवरील रोकडे बिल्डींगजवळील कॉंग्रेस कार्यालयात स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित डोंबिवली विधानसभा युवक कॉंग्रेस व डोंबिवली शहर कॉग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वपोनि संजय साबळे यांची भेट घेऊन चर्चा केली.
तसेच झोपडपट्टीतील गरिबांना कॉंग्रेस पदाधिकाऱ्या अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले.यावेळी कल्याण-डोंबिवली जिल्हा युवक कॉंग्रेस प्रभारी सोनललक्ष्मी घाग,म.प्र.कॉं.क.सचिव संतोष केणे,क.डों.जि.यु.अध्यक्ष मनिष देसले,प्रदेश यु.कॉं.सचिव गायत्री सेन, डोंबिवली ब्लॉक कॉग्रेस माजी कार्याध्यक्ष एकनाथ म्हात्रे,डोंबिवीली विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष पमेश म्हात्रे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment