Header AD

आयटी आणि ऊर्जा स्टॉक्सची दमदार कामगिरी आठवड्याची सकारात्मक सुरुवात
मुंबई, २३ नोव्हेंबर २०२० :  बेंचमार्क निर्देशांकांनी सकारात्मक बिंदुवर आठवड्याची सुरुवात करत उच्च्चांकी स्थिती गाठली. आयटी आणि ऊर्जा स्टॉक्सनी नफा नोंदवला. आरबीआयच्या ताज्या शिफारशींनंतर प्रमुख वित्तीय स्टॉक्सना नकारात्मक अनुभव आले. निफ्टीने ०.५२% किंवा ६७.४० अंकांची वृद्धी घेतली. निफ्टीने १२,००० अंकांची पातळी ओलांडत १२,९२६.४५ वर विश्रांती घेतली. बीएसई सेन्सेक्स ०.४४% किंवा १९४.९० अंकांनी वाढला व ४४,०७७.१५ अंकांवर स्थिरावला. आज जवळपास १६३६ शेअर्सनी नफा कमावला ११३३ शेअर्स घसरले तर १७८ शेअर्समध्ये बदल दिसून आले नाहीत.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की ओएनजीसी (६.६३%), इंडसइंड बँक (३.७९%), गेल (३.५४%), डॉ. रेड्डीज (३.५१%) आणि इन्फोसिस (३.१९%) हे टॉप निफ्टी गेनर्स ठरले. तर एचडीएफसी (३.५०%), आयसीआयसीआय बँक (२.४९%), अॅक्सीस बँक (१.७९%), एसबीआय लाइफ (१.७५%) आणि टायटन (१.७३%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.


सेक्टरल आकडेवारीचा विचार करता, सर्व सेक्टरल निर्देशांकांनी हिरव्या रंगात व्यापार केला. याला अपवाद बँकिंग क्षेत्राचा ठरला. आयटी आणि ऊर्जा स्टॉक्सनी वृद्धीचे नेतृत्व केले. बीएसई मिडकॅपने १.२५% तर बीएसई स्मॉलकॅपने १.३७% नी वृद्धी अनुभवली.


स्ट्राइड्स फार्मा सायन्स लि.: अॅलर्जी, अर्थरायटीस इत्यादी प्रकारच्या आजारांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रेडनायझोन टॅबलेटच्या जेनरीक व्हर्जनसाठी स्ट्राइड्स फार्मा कंपनीला अमेरिकेची मंजूरी मिळाली. यूएसएफडीएची मंजूरी मिळाल्यानंतरही कंपनीचे स्टॉक्स १.८९% नी घसरले व त्यांनी ६९७ रुपयांवर व्यापार केला.


माइंड ट्री लिमिटेड: कंपनीने नॉर्डेक्स ग्रुप या अग्रगण्य पवन चक्की उत्पादकासोबत ५ वर्षांच्या कराराची घोषणा केल्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ३.३८% नी वाढले व त्यांनी १४०३.३० रुपयांवर व्यापार केला.

 

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड: द कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने २४,७१३ कोटी रुपयांचे फ्युचर ग्रुप रिलायन्स रिटेल डील मंजूर केले. त्यामुळे कंपनीचे स्टॉक्स २.९३% नी वाढले व त्यांनी १,९५५ रुपयांवर व्यापार केला. तर दुसरीकडे, फ्युचर रिटेल लिमिटेड कंपनीचे स्टॉक्स ९.९९% नी वाढले व त्यांनी ७९.२५ रुपयांवर व्यापार केला.


आयआयएफएल फायनान्स लि.: आयआयएफएल फायनान्स लि. कंपनीचे स्टॉक्स १.०८% नी वाढले व त्यांनी ११६.९० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने पूर्णपणे पेड-अप इक्विटी शेअर्स विकत घेण्यास मंजूरी दिली, ५४ रुपये प्रति इक्विटी शेअरपेक्षा जास्त मूल्य नसलेल्या कंपनीच्या सदस्यांकडून हे शेअर्स विकत घेतले जातील. या घोषणेनंतर स्टॉक्सची स्थिती बदलली.


भारतीय रुपया: सकारात्मक इक्विटी बाजारातील संकेतामुळे भारतीय रुपयाने आधीचे नुकसान भरून काढले. अमेरिकी डॉलरचत्या तुलनेत भारतीय रुपयाने ७४.१० रुपये मूल्य गाठले.


जागतिक बाजार: कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ, आर्थिक लॉकडाऊनची चिंता, अमेरिकेच्या मदत पॅकेजबाबत अनिश्चितता यामुळे जागतिक बाजार निर्देशांकांनी आजच्या सत्रात संमिश्र संकेत दर्शवले. नॅसडॅक आणि निक्केई २२५ चे शेअर्स ०.४२% नी घसरले तर एफटीएसई एमआयबी, एफटीएसई १०० आणि हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ०.९०%, ०.३१% आणि ०.१३% नी वधारले.

आयटी आणि ऊर्जा स्टॉक्सची दमदार कामगिरी आठवड्याची सकारात्मक सुरुवात आयटी आणि ऊर्जा स्टॉक्सची दमदार कामगिरी आठवड्याची सकारात्मक सुरुवात Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads