Header AD

वंचित बहुजन युवा आघाडी ऑनलाईन सदस्य नोंदणी मोहीमेचे एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे हस्ते उद्घाटन
अकोला ,  प्रतिनिधी  :  वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने "ऑनलाईन सदस्य नोंदणी" सुरू करण्यात आली त्या "ऑनलाईन सदस्य नोंदणी गुगल फॉर्म" सार्वजनिक करीत युवा आघाडी सदस्य नोंदणी मोहीमेचे एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे हस्ते उद्घाटन संपन्न झाले.


सभासद होण्यासाठी ह्या link वर क्लीक करा 

https://forms.gle/ntCWyoWMrenFxp697


वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा ह्यांचे नेतृत्वाखाली राज्यातील युवा आघाडीची बांधणी सुरू करण्यात आली. २३ नोव्हेंबर २०२० पासून प्रदेश कार्यकारणी राज्यातील विविध जिल्ह्यातील दौरे प्रारंभ करणार आहेत." गाव तेथे शाखा आणि वार्ड तेथे बोर्ड" ही मोहीम राज्यभर उभारली जाणार असून घर तेथे वंचित युवा आघाडीचा कार्यकर्ता निर्माण करण्याचा संकल्प प्रदेश पदाधिकारी ह्यांनी केला आहे.


त्याअनुषंगाने काल युवा आघाडीच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी गुगल फॉर्म" सार्वजनिक करीत युवा आघाडी सदस्य नोंदणी मोहीमेचे एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे हस्ते यशवंत भवन अकोला येथे रीतसर उदघाटन करून नोंदणी खुली करण्यात आली.या नोंदणी मोहिमेत लाखो संख्येने युवा कार्यकर्त्यांनी नोंदणी करून युवा आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केले आहे.


वंचित बहुजन युवा आघाडी ऑनलाईन सदस्य नोंदणी मोहीमेचे एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे हस्ते उद्घाटन वंचित बहुजन युवा आघाडी ऑनलाईन सदस्य नोंदणी मोहीमेचे एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे हस्ते उद्घाटन Reviewed by News1 Marathi on November 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads