Header AD

एमजी ग्लॉस्टरने गाठला २००० बुकिंग्सचा टप्पा
मुंबई, १० नोव्हेंबर २०२० : एमजी ग्लॉस्टर या भारतातील पहिल्या लेव्हल-१ ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्हीच्या लाँचिंगनंतर अल्पावधीतच २००० बुकिंग्सचा टप्पा गाठला आहे. भारतातील पहिली कनेक्टेड एसुयव्ही एमजी हेक्टर आणि भारतातील पहिली कनेक्टेड इलेक्ट्रिक एसयुव्ही एमजी झेडएस इव्ही नंतर ही एमजीची या श्रेणीतील तिसरी कार आहे. लाँचिंगनंतर काही दिवसातच तिची विक्री सुरु झाली. एमजी ग्लॉस्टर ही सध्या २९.९८ लाख रुपये किंमतीत उपलब्ध आहे.

  

एमजी ग्लॉस्टरमध्ये या सेगमेंटमधील प्रथमच अशी अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम समाविष्ट आहे. यातील काही मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये अडाप्टिव्ह क्रूस कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, आणि ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट यांचा समावेश आहे. तसेच फॉरवर्ड कोलायजन वॉर्मिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन या सुविधांचाही समावेश आहे.


ग्लॉस्टर ऑन डिमांड फोर-व्हील ड्राइव्ह सुविधेसह येते, ज्याद्वारे विविध ड्रायव्हिंग मोड्स मिळतात. यात इंटेलिजंट ऑल टेरेन सिस्टिम असून त्यात ऑफ रोडिंगदरम्यान अधिक कंट्रोलची सुविधा मिळते. यात समर्पित असे रिअर डिफरन्शिअल आणि बोर्जवॉर्नर ट्रान्सफर केस असून अत्याधुनिक शिफ्ट-ऑन-द-फ्लाय तंत्रज्ञानही आहे. यात स्नो, मड, सँड, इको, स्पोर्ट, नॉर्मल आणि रॉक असे सात विविध प्रकारचे ड्रायव्हिंग मोड्स येतात.

एमजी ग्लॉस्टरने गाठला २००० बुकिंग्सचा टप्पा एमजी ग्लॉस्टरने गाठला २००० बुकिंग्सचा टप्पा Reviewed by News1 Marathi on November 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads