Header AD

आंबडीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ प्रभात अकॅडमी संचालित ध्येयस्फूर्ती वाचनालयाचे उदघाटन


या वाचनालयातून संवेदनशील अधिकारी घडतील असा विश्वास आहे पीएसआय रविंद आव्हाड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या संधीचे सोने करा-प्रमोद पवार..


भिवंडी ,  प्रतिनिधी  :  तालुक्यातील  आंबडी इथं  प्रभात अकॅडमी या पोलीस भरतीपूर्वप्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या "ध्येयस्फूर्ती" या वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन झाले. पोलीस अधिकारी पीएसआय रवींद्र आव्हाड आणि श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ता तथा युवक प्रमुख प्रमोद पवार* यांच्या हस्ते हे उदघाटन पार पडले.  


या वाचनालयातून संवेदनशील अधिकारी घडतील असा विश्वास आहे असे यावेळी पीएसआय रविंद आव्हाड यांनी सांगितले,प्रभात अकॅडमी ने आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे, या मिळालेल्या या संधीचे सोने करा असे यावेळी प्रमोद पवार यांनी सांगितले. यावेळी प्रेरणा फाऊंडेशन चे राजेंद्र भांगरे यांची उपस्थित होती. या उपक्रमात कोणत्याही मदतीला आम्ही तत्पर असू असे भांगरे यांनी सांगितले।


अंबाडी मध्ये गेली अनेक वर्षे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी प्रभात अकॅडमी ही एक नावाजलेली संस्था आहे. या संस्थेने अनेक तरुणांना पोलीस आणि वनरक्षक बनवले, आता या संस्थेने औरंगाबाद येथील श्री साळवे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अंबाडी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत एक संधी उपलब्ध केली आहे. 


येथे लवकरच स्पर्धा परीक्षा पुर्व तयारी साठी एक स्वातंत्र्य बॅच सुरू करण्याची मुहुर्तमेढ आज रोवण्यात आली. या केंद्रातून भविष्यात  विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ञ लोकांच्या मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आज पोलीस अधिकरी पीएसआय रवींद्र आव्हाड आणि सुप्रसिद्ध तरुण नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे युवा नेते प्रमोद पवार यांच्या हस्ते हा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. ध्येयस्फूर्ती या नावाने स्पर्धा परीक्षा संबंधित पुस्तके उपलब्ध असणाऱ्या वाचनालयाचे उदघाटन यावेळी करण्यात आले.


पाहुण्यांनी भाषणामध्ये विध्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असे मार्गदर्शन करून स्फूर्ती निर्माण केले. यावेळी प्रमोद पवार यांनी संधी देवतेची गोष्ट सांगत विध्यार्थ्यांना संधीचे महत्व सांगितले.यावेळी प्रभात अकॅडमी चे जितेंद्र मोरे सर यांनी सर्वांचे स्वागत आणि आभार केले.
आंबडीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ प्रभात अकॅडमी संचालित ध्येयस्फूर्ती वाचनालयाचे उदघाटन आंबडीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ प्रभात अकॅडमी संचालित ध्येयस्फूर्ती वाचनालयाचे उदघाटन Reviewed by News1 Marathi on November 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads