Header AD

चितळे बंधू पुणे - मुंबई नंतर आता आता ठाण्यात सिने कलाकार मुक्ता बर्वे यांच्या हस्ते चितळे बंधू या दुकानाचे उदघाटन करण्यात आले


  


ठाणे , प्रतिनिधी  :  पुणे -  मुंबई नंतर आता चितळे बंधू यांनी ठाण्यात ठाण मांडले  ठाण्यातील नौपाडा परिसरातील गोखले रोड येथे आज रोजी मराठी सृष्टीतील सिनेकलाकार मुक्ता बर्वे यांच्या हस्ते  चितळे बंधू या दुकानाचे उदघाटन करण्यात आले यावेळी  चितळे बंधू उद्योग समूह ची टीम देखील उपस्थित होते चितळेंची मिठाई म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे ,पाडव्याला किंवा इतर सणांना चितळेंची मिठाई एकमेकांना देणे हा एक उत्सव असल्यासारखं वाटतं आणि ही संस्कृती आता ठाणेकरांना अनुभवयाला मिळणार असल्याने याचा मोठा आनंद असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी केले आहे.लॉकडाऊनमुळे पूर्ण सिस्टीम हलली असली तरी जिथे डाऊनफॉल असतो तिथे वर जाण्याचा मार्ग देखील असतो आणि अशाप्रकारच्या फ्रांचायसी सुरु होणे ही उद्योगधंद्यासाठी सकारात्मक चित्र असल्याचे बर्वे यांनी सांगितले विविध स्वरूपाची मिठाई आणि रुचकर खाद्यपदार्थांसाठी चितळे यांच्या पुण्यातील दुकानात सकाळी आणि सायंकाळी नेहमीच गर्दी असते. शॉपच्या पहिल्याच दिवशी ठाणेकरांनी मिठाई घेण्यासाठी गर्दी केली होती. चितळेंची प्रसिद्ध असलेली भाकरवाडी यापूर्वी देखील ठाण्यात मिळत असली तरी आता सर्वच मिठाई एकाच छताखाली मिळणार असल्याने मुक्ता बर्वे यांनी सांगितले आहे.
चितळे बंधू पुणे - मुंबई नंतर आता आता ठाण्यात सिने कलाकार मुक्ता बर्वे यांच्या हस्ते चितळे बंधू या दुकानाचे उदघाटन करण्यात आले  चितळे बंधू पुणे - मुंबई नंतर आता आता ठाण्यात सिने कलाकार मुक्ता बर्वे यांच्या हस्ते चितळे बंधू या दुकानाचे उदघाटन करण्यात आले Reviewed by News1 Marathi on November 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित..

भिवंडी : दि.२८ ( प्रतिनिधी )   राज्य शासनाने शिक्षणासंदर्भात कोणतेही धोरण निश्चित न केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग हैराण झाला असतानाच  अन...

Post AD

home ads