Header AD

पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे मिशन पहाटे फत्ते

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  बहुचर्चित पत्रिपुलाच्या आवाढव्य ७०० टन वजन७६.३३ मीटर लांब, ११मीटर उंच गर्डर टाकण्याचे १८ मीटर शिल्लक राहिलेले काम रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेवर विशेष ब्लॉक घेण्यात येऊन उर्वरित १० टक्के कामही सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पूर्ण करण्यात आले. अंतिम टप्प्यात आलेल्या या पुलाचा सर्वात कठीण आणि तितकाच महत्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांसह  सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. विशेष म्हणजे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वतः गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण होईपर्यंत उपस्थित होते.


 पत्रीपुलाच्या सर्वात मोठ्या अशा ७६.३३ मीटर लांब गर्डर लाँचिंगसाठी २१ आणि २२ नोव्हेंबरला मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला. यातील पहिल्या दिवशी २२ नोव्हेंबरला या गर्डरचे नियोजित ४० मीटर ढकलण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. तर २२ तारखेला मेगाब्लॉक सुरू होण्यास झालेल्या विलंबामूळे ९० टक्केच काम  होऊ पूर्ण शकले. उर्वरित १० टक्के कामासाठी पुन्हा रेल्वेच्या विशेष  ब्लॉकची आवश्यकता होती. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांच्याशी चर्चा करीत लवकरात लवकर ब्लॉक मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रेल्वे प्रशासनानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मध्यरात्री १.३० मिनिटे ते ३ वाजण्याच्या सुमारास विशेष ब्लॉक मंजूर केला.


 या विशेष ब्लॉकची वेळ संपेपर्यंत हा गर्डर सुरक्षित अंतरावर पोहचवण्यात यश आल्याने ब्लॉक संपल्यानंतरही गर्डर ढकलण्याचे काम सुरूच होते. खालून लोकल आणि एक्स्प्रेस जात असतानाही त्यावर हा महाकाय गर्डर हलवण्याचे काम सुरूच होते. मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास सुरू झालेले गर्डर लाँचिंगचे काम सकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरू होते.दरम्यान या ७६.३३ मीटर लांब गर्डरचा ३ मीटरचा भाग नियोजित जागेवर पोहचणे शिल्लक असताना आणखी एका तांत्रिक बिघाडामुळे काम काही काळ थांबले होते. मात्र हा बिघाडही तातडीने दुरुस्त करीत अखेर ६ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास या गर्डरचे यशस्वीपणे लाँचिंगचे काम फत्ते करण्यात आले. गर्डर लाँचिंगचा अत्यंत महत्वाचा टप्पा पार पडल्याने सर्वांनी एकच जल्लोष केला.


गर्डरचे लाँचिंग करण्यासाठी दिवसभरात अनेक तांत्रिक अडचणी आल्या. मात्र सर्वांच्याच दृढनिश्चयामुळे या अडचणींवर मात करून गर्डरचे यशस्वीपणे लाँचिंग झाल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. तर यापुढील दुसऱ्या गर्डरसह ऍप्रोच रोडचे काम आता युद्धपातळीवर करण्याच्या सूचना एमएसआरडीसीला दिल्याचेही खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.यावेळी डोंबिवली परिवहन सभापती मनोज चौधरी, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक महेश गायकवाड, माजी नगरसेवक कैलास शिंदे व शिवसैनिक पदाधिकारी, गर्डर सरकविण्यासाठी कार्यरत असलेले कामगार कर्मचारी, पोलीस कर्मचारी आधिकारी यांनी जल्लोष केला.

पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे मिशन पहाटे फत्ते पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे मिशन पहाटे फत्ते Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads