Header AD

शेअर बाजारात सलग आठव्या दिवशी तेजी
मुंबई, ११ नोव्हेंबर २०२० : सेन्सेक्स आणि निफ्टी या भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी सलग ८ सत्रांमध्ये वृद्धी दर्शवत आज जवळपास १ टक्क्यांची वाढ नोंदवली. धातू, फार्मा आणि ऑटोमोबाइल स्टॉक्समध्ये आज उत्कृष्ट कामगिरी दिसून आली. निफ्टी ०.९३% किंवा ११८.०५ बेस पॉइंटने वाढला तसेच १२,७०० च्या पातळीपुुढे १२,७४९.१५ अंकांवर स्थिरावला. तर बीएसई सेन्सेक्स ०.७३% किंवा ३१६.०२ अंकांनी वाढत ४३,५९३.६७ अंकांवर स्थिरावला. आज जवळपास १,४५० शेअर्सनी नफा कमावला, १,२७९ शेअर्स घसरले तर २०५ शेअर्स स्थिर राहिले.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात टाटा स्टील (७.२५%), हिंडाल्को (६.०८%), अॅक्सिस बँक (४.२९%), आयशर मोटर्स (४.११%), डॉ. रेड्डीज लॅब्स (३.९२%) आणि बजाज फायनान्स (३.८५%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे इंडसइंड बँक (५.६६%), रिलायन्स (४.१९%), टायटन कंपनी (२.३५%), एशियन पेंट्स (०.८२%) आणि ब्रिटानिया (०.४४%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

सरकारने निर्मिती उद्योगाला गती देत दोन लाख कोटींच्या पीएलआय योजनेला मंजूरी दिली. यामुळे बाजाराला वेग आला. मात्र मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे रिलायन्सला नुकसान भोगावे लागले.


लार्सन अँड टर्बो लि.: आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून वीज हस्तांतरण आणि वितरण सहाय्यक कंपन्यांच्या यशस्वी ऑर्डर्सनंतर एलअँडटी कंपनीचे शेअर्स २.५ % नी वाढले व त्यांनी १,०६१ रुपये प्रति शेअर या मूल्यावर एनएसईवर व्यापार केला. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडोअर ओलांडत उत्तर प्रदेश सरकारच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या (एनसीआरटीसी) अंतर्गत पायाभूत सुविधासंबंधी ऑर्डरदेखील कंपनीला मिळाली.


गोदरेज इंडस्ट्रीज: आर्थिक वर्ष २०२०-२ मधील दुस-या तिमाहीत कंपनीच्या अंदाजानुसार निव्वळ नफ्यात जवळपास ४५% नुकसान झाले. सुरुवातीला केलेल्या ३२.२ कोटी रुपये या अंदाजापेक्षा तो २०५.३ कोटी रुपये एवढाच असेल. कंपनीचा महसूलदेखील ९.२% च्या घसरणीसह कमी झाला. तो मागील वर्षी २,६२८.७ कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी २,३८६.३ कोटी रुपयांवर घसरला.


विप्रो लि.: अॅनालिटिक्स आणि सर्च आधारात सेवा विकसित करण्याकरिता थॉट स्पॉटशी यशस्वी करार केल्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीनेचे शेअर्, ०.०९% नी वधारले व ते ३४२.६/ शेअर वर स्थिरावले.


भारतीय रुपया: १० नोव्हेंबरच्या व्यापारी सत्राच्या तुलनेत भारतीय रुपया २० पैशांनी वधारला. देशांतर्गत इक्विटी बाजाराच्या कामगिरीवर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७४.५१ चे मूल्य गाठले.


जागतिक बाजार: जागतिक बाजारात, कोव्हिड-१९ लस मिळण्याची आशादायी चर्चा असूनही गुंतवणुकदार अजूनही खबरदारीने व्यापार करत आहेत. लसीच्या चाचण्यांच्या चर्चेनंतर जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणावर व्यापार दिसून आला. तथापि, अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांमध्ये कोव्हिड-१९ च्या दुस-या लाटेमुळे चिंतेचे वातावरण कायम होते. एफटीएसई १०० चे शेअर्स ०.९७% नी वाढले, तर नॅसडॅकचे शेअर्स १.३७% नी घसरले. निक्केई २२५ चे शेअर्स १.७८% वाढले तर हँगसेंगचे शेअर्स ०.२८% नी घटले.

शेअर बाजारात सलग आठव्या दिवशी तेजी शेअर बाजारात सलग आठव्या दिवशी तेजी Reviewed by News1 Marathi on November 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads