Header AD

युनियन बँक ऑफ इंडियाला ५१७ कोटींचा नफा


◆दुस-या तिमाहीच्या परिणामांची केली घोषणा...


मुंबई, ८ नोव्हेंबर २०२० : युनियन बँक ऑफ इंडिया (यूबीआय)चा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबरमधील दुस-या तिमाहीत ५५.३ टक्के वाढीसह ५१७ कोटी रुपये झाला आहे. याच चालू वर्षातील एप्रिल ते जूनमधील पहिल्या तिमाहीत बँकेला ३३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर गेले वित्त वर्ष २०१९-२०च्या दुस-या तिमाहीत बँकेला १,१९४ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. 


बँकेने संचालक मंडळाच्या बैठकीनंतर देण्यात आलेल्या आर्थिक लेखाजोखामध्ये सांगितले की बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न चालू वित्त वर्षाच्या दुस-या तिमाहीत ६.१ टक्क्यांनी वाढून ६२९३ कोटी रुपये झाले आहे जे एक वर्षापूर्वी २०१९-२०च्या दुस-या तिमाहीत ५,९३४ कोटी रुपये होते. बँकेचे अन्य उत्पन्न याच कालावधीत २३०८ कोटी रुपये राहिले आहे जे गत आर्थिक वर्षाच्या समान कालावधीत ११४३ कोटी रुपये होते. बँकेचा एनपीए चालू वित्त वर्ष जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या एकूण कर्जाच्या १४.७१ टक्के राहिला जो एक वर्षांपूर्वी २०१९-२० च्या तिमाहीत १५.७५ टक्के होता. बँकेचा निव्वळ एनपीए किंवा बुडीत कर्जात तिमाहीत घट होऊन ४.१३ टक्क्यांवर आले जे गतवर्षी सामान कालावधीत ६.४० टक्के होते.               

युनियन बँक ऑफ इंडियाला ५१७ कोटींचा नफा युनियन बँक ऑफ इंडियाला ५१७ कोटींचा नफा Reviewed by News1 Marathi on November 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads