Header AD

सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आर पी आय चा तहसील कार्यलयावर आक्रोश मोर्चा

कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आरपीआयच्या आंबेडकर गटाच्या वतीने कल्याणच्या तहसील कार्यलयलयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण देशामध्ये कोरोना महामारी मुळे लॉकडाऊन लागले. त्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या हाताला काम धंदा  राहिला नाही. लॉकडाऊनच्या काळात महाविकास आघाडीचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी  जनतेला आश्वासन दिले होते की कोरोना मुळे नागरिकांना वीज बिल मध्ये मोठा दिला जाईल परंतु नागरिकांना भरमसाठ वीज बिल  महावितरण कडून दिले गेले कमी करत नागरिकांना दिलासा देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात भाजप मनसे आरपीआयकडून आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज कल्याण तहसील कार्यलया वर देखील वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आरपीआय (आंबेडकर गटार्फे ) मोर्चा काढण्यात आला.


या मोर्चात आरपीआय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय संघटक सुनील खांबे यांच्या प्रमुख उपस्थिती व जिल्हा अध्यक्ष धर्मा वक्ते यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर उद्यान ते तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील कार्यलया बाहेर घोषणाबाजी करत वीजबिले माफ करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेत निवेदन सादर करत लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी करत सदर निवेदन सरकार पर्यंत पोहचवण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते, युवक जिल्हाध्यक्ष सुमित माने, कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव, अन्वर शेख, किसन रोडे, लक्ष्मण हजारे आदींसह सहित शेकडो कार्यकर्ते  व महिला उपस्थित होते.

सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आर पी आय चा तहसील कार्यलयावर आक्रोश मोर्चा सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आर पी आय चा तहसील कार्यलयावर आक्रोश मोर्चा Reviewed by News1 Marathi on November 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads