Header AD

किरण नाकती यांनी केला आपल्या वुई आर फॉर युच्या सेवेकर्‍यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान
ठाणे, प्रतिनिधी  : आदित्य प्रतिष्ठान, ठाणेच्या वुई आर फॉर यू या अभियानाअंतर्गत कोरोनाकाळात २१ मार्च २०२०पासून ज्येष्ठ नागरिक व गरजूंना मोफत घरपोच सेवा देण्याचे सेवाकार्य सलग सात ते आठ महीने दिवस रात्र सुरू आहे. अगदी सुरूवातीला साडेचार हजार मास्कचे वाटप नौपाडा विभागातील ज्येष्ठ नागरिकांना व गरजूंना करण्यात आले. तसेच जुन्या ठाण्यातील विशेषतः नौपाडा विभागातील अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले परदेशात किंवा परगावी शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित गेली आहेत किंबहुना तिथेच आपलं बस्तान बांधून आहेत. त्यांच्या इथे राहणार्‍या एकट्या आई वडिलांना सेवा देण्याचं सेवाकार्य वुई आर फॉर युचे सेवेकरी करीत आहेत. अगदी मार्चपासून ते आजपर्यंत गरज लक्षात घेऊन सेवा देण्याचं काम किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या स्वताच्या थेट सहभागातून करण्यात येत आहे. 
सुरुवातीच्या काळात भाजीविक्रेते , फेरीवाले जास्त प्रमाणात फिरत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होतोय हे लक्षात आल्याने घरपोच भाजी सेवा सुरू करण्यात आली. मध्यरात्री नाशिकहून थेट शेतातून आलेली भाजीची गाडी खाली करून त्याची साफसफाई करून सर्व नियमांचे पालन करून पिशव्यांमध्ये भरून ऑनलाईन नोंद करून आपल्या सेवेकर्‍यांमार्फत ज्येष्ठ व गरजूंना भाजी घरपोच सेवा देण्यात आली व आजही देण्यात येते.एकटे रहात असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक किंवा दोघे जरी रहात असले तरीही त्यातील एक जण अंथरुणाला खिळून आहेत, अशा जवळजवळ ऐंशी  ज्येष्ठ नागरिकांना टिफीन सेवा देण्यात येते. त्यातील पन्नास टक्के ज्येष्ठांना संस्थेतर्फे विनामूल्य टिफीन सेवा देण्यात येते. 
लॉकडाउन काळात वाहन बंदी असल्याने कित्येक ज्येष्ठ नागरिकांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अथवा इतर कोणत्याही तातडीच्या कामासाठी रिक्षा सेवा देण्यात येत आहे. या सेवेसाठी एकूण दहा रिक्षा वुई आर फॉर यू ने सज्ज ठेवल्या आहेत. या रिक्षा सेवेचा लाभ शेकडो ज्येष्ठ नागरिक व गरजूंना मिळाला.ठाणे शहरातील कित्येक ज्येष्ठ नागरिक व गरजूंना ऑक्सिजन लेव्हल व ताप तपासणीसाठी मोफत वैद्यकीय तपासणी सेवेच्या माध्यमातून थेट घरी जाऊन आपल्या सवेकर्‍यांनी सेवा दिली.
दैनंदिन जीवनात लागणाऱ्या किराणा माल सामानाची यादी घेऊन शेकडो ज्येष्ठांना घरपोच किराणा माल नेऊन देण्याची सेवा त्याचप्रमाणे औषधे घरपोच सेवा हि या अनेक सेवांमधील महत्त्वपूर्ण सेवा आहे रात्री-अपरात्री ज्या ज्येष्ठ नागरिकांना ब्लड प्रेशर शुगर हृदय विकार किडनीचे व इतर अनेक आजारांवरील औषधे तातडीने घरपोच करण्याची सेवा हजारो ज्येष्ठांना व गरजूंना देण्यात येते. कोरोना रुग्ण ज्या इमारतीत किंवा इतर वसाहतीत सापडल्यास तेथील परिसर तसेच त्यांच्या घराची वास्तु मोफत निर्जंतुकीकरण करण्याची सेवा वुई आर फॉर यू च्या माध्यमातून दिली जाते.


सुरवातीच्या काळात आयुष्य मंत्रालयाकडून आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांच्या सेवना बद्दलची माहिती देण्यात आल्यानंतर वुई आर यु च्या सेवेकर्‍यांनी मोफत घरपोच या गोळ्यांचे वाटप हजारो ज्येष्ठ नागरिकांना केले. कोरोना काळात अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच उपासमारीची वेळ विविध घटकांतील लोकांवर आली अशावेळी तळागाळातून रोजच्या कमाईवर आपले पोट अवलंबून असणाऱ्या सुमारे अडीच हजार कुटुंबांना एक महिना पुरेसे होईल अशा मोफत धान्य तसेच जजीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.  

प्लाजमा डोनेट सेवेच्या माध्यमातून आजपर्यंत पंचावन्न कोरोना रुग्णांना प्लाजमा डोनेट करण्याची सेवा वुई आर यु च्या माध्यमातून करण्यात आली. कोरोना रुग्णांसाठी हेल्पलाईन व कौन्सिलिंग म्हणजेच समुपदेशन सेवेच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास आठशे कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना ही सेवा देण्यात आली. 


कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न त्या संपुर्ण कुटुंबासमोर येत असताना त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने त्यांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे, अंबुलन्स, त्यांना उपचारासाठी लागणारी रेमडिसिव्हर, अक्टेमा सारखी इंजेक्शन उपलब्ध करून देणे व सर्वात व सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोना रुग्णांना व नातेवाईकांना समुपदेशन करून मानसिकरीत्या आत्मविश्वास वाढविण्याचे काम या सेवेच्या माध्यमातून करण्यात आले.

या व अशा अनेक सेवा किरण नाकती यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या वुई आर फॉर यु अभियानाअंतर्गत नौपाडा विभागातील एकुण पंचावन्न सेवेकरी देत आहेत. या सर्व सेवेकर्‍यांचा सन्मान महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत सेवेकरी सन्मान हे सन्मानपत्र देऊन करण्यात आला. 


त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रवासात हॉस्पिटल प्रशासन ठाणे महानगरपालिका पोलीस बांधव सर्व स्तरातील पत्रकार बांधव, समाजातील विविध घटक तसेच पालक मंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के या सर्वाचे सर्वांचेच किरण नाकती यांनी आभार मानले व वी आर फॉर यू च्या चा हा प्रवास केवळ कोरोना काळापुरता मर्यादित न ठेवता पुढेही असाच सुरू राहील ही ग्वाही त्यांनी दिली

किरण नाकती यांनी केला आपल्या वुई आर फॉर युच्या सेवेकर्‍यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान किरण नाकती यांनी केला आपल्या वुई आर फॉर युच्या सेवेकर्‍यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान Reviewed by News1 Marathi on November 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित..

भिवंडी : दि.२८ ( प्रतिनिधी )   राज्य शासनाने शिक्षणासंदर्भात कोणतेही धोरण निश्चित न केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग हैराण झाला असतानाच  अन...

Post AD

home ads