Header AD

सवलत दिल्याशिवाय वीज बिल भरू नका प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन

  मुंबई, प्रतिनिधी  :  राज्याचे मुख्यमंत्री कोण ते आधी जाहीर करा असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यालयात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली. भाजपच्या काळात वीज बिलाची वसुली न झाल्याने सरकारवर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडला आहे. राज्य सरकारने ग्राहकांना वीज बिल माफ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. 


विज बिल माफ केले नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 50% विज माफी करण्यात यावी हे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले असून तसा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारकडे दिला होता. मात्र हा प्रस्ताव राज्यातील एका मंत्र्याने दाबून ठेवल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण आहे अजित पवार की उद्धव ठाकरे हे सरकारने जाहीर करावे असा खोचक टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.


सवलत दिल्याशिवाय वीज बिल भरू नका प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन सवलत दिल्याशिवाय वीज बिल भरू नका प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads