आयटीसी लिमिटेडच्या सनफीस्ट यिप्पी !ने क्विक मील्झच्या लाँचसह तयार केली ‘नूडल्स इन अ बाउल’ ही इन्स्टंट नूडल्सची नवीन कॅटेगरी
नॅशनल, २३ नोव्हेंबर २०२० : सनफीस्ट यिप्पी ! या भारतातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट नूडल्स ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या ब्रँडने पुन्हा एकदा इन्स्टंट नूडल्स सेगमेंटमध्ये नवतेचे दर्शन घडवत क्विक मील्झच्या माध्यमातून ग्राहकांसाठी एका बाउलमध्ये नूडल्स ऑफर करणारा एक नवीन खाद्यानुभव विकसित केला आहे. नवीनतम उत्पादन/ फॉरमॅटने देशातील या सेगमेंटमध्ये एक स्वागतार्ह बदल केला आहे. इन्स्टंट नूडल्स आता ग्राहकांना बाउल फॉरमॅटमध्ये उपलब्ध होतील.
इन्स्टंट नूडल्सच्या श्रेष्ठ खाद्यानुभवाची निश्चिती करण्यासाठी असंख्य प्रयोग केल्यानंतर सनफीस्ट यिप्पी ! क्विक मील्झ बाउल फॉरमॅटमध्ये सर्वांपुढे आणण्यात आले आहे. यात नूडल्स एका रुंद कंटेरन बेसमध्ये ग्राहकांना मिळतील, त्यामुळे त्यांचे मिश्रण करणे तसेच ती खाणे खूपच सोपे होईल. शिवाय या बाउलला झाकणही असेल, जेणेकरून नूडल्स तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यातील उष्णता बाहेर पडणार नाही व ती एकसमान शिजवली जातील. हा दर्जेदार फॉरमॅट आणि त्याला मिळालेली चविष्ट फ्लेवर्सची जोड यांमुळे हा बाउल उत्तमरित्या मिक्स केलेली व चविष्ट नूडल्स ग्राहकांना देऊ करेल.
व्हेजी डिलाइट आणि चिकन डिलाइट या दोन व्हेरिएंट्समध्ये ही नूडल्स उपलब्ध आहेत.
आयटीसी च्या प्रवक्त्याने या लाँचबद्दल सांगितले, “नावीन्यता आणि वेगळेपणा हे स्थापनेपासूनच सनफीस्ट YiPPee!च्या डीएनएतील प्रमुख स्तंभ राहिले आहेत. आमच्या वर्तुळाकार काळ्या नूडल्सच्या माध्यमातून ग्राहकांना मिळत असलेला लांबलचक व सरसरीत नूडल्सचा अनुभव असो किंवा अलीकडील बाउल फॉरमॅटमधील क्विक मील्झ असोत, प्रत्येक उत्पादन हे विचारपूर्वक विकसित करण्यात आले आहे. ग्राहकाला श्रेष्ठ अनुभव देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा विस्तार आहे.
अलीकडील काळात इन्स्टण्ट नूडल्सच्या मागणीत अभूतपूर्व वाढ झाली आहे, कारण, ग्राहकांच्या दैनंदिन जीवनशैलीत लक्षणीय बदल झाले आहेत. वर्क फ्रॉम होम हे नवीन परिस्थितीचे अविभाज्य अंग झाले आहे. जीवनशैलीतील बदल बघता, ग्राहक अन्नपदार्थांच्या विश्वासार्ह पर्यायांची निवड करत आहेत. हे पर्याय वैविध्य, चविष्ट व सोयीस्कर आहेत आणि सुरक्षितता व आरोग्याचा वायदा यात आहे. क्विक मील्झच्या माध्यमातून आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण इन्स्टंट नूडल अनुभव देण्याबाबत आम्ही खूपच आशावादी आहोत आणि YiPPee! परिवारात एका नवीन सदस्याची भर घालताना आम्हाला आनंद होत आहे.”
हे प्रोडक्ट भारतभरातील लार्ज फॉरमॅट स्टोअर्समध्ये, मॉडर्न ट्रेडमध्ये तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.

Post a Comment