Header AD

खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याला यश

 ठाणे , प्रतिनिधी  :  परतीच्या धुवादार पावसात २१ ऑक्टोबर रोजी वीज कोसळून कु. सुप्रियन सचिन भंडारी या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला हि दुर्घटना मीरा भाईंदर मधील उत्तन येथील पाली गावातील पातान परिसरात घडली. हा मुलगा क्रिकेट खेळत असताना त्याच्या अंगावर वीज पडली यात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्याला तत्काळ मीरा रोड येथील वोखार्ट या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. तो अतिशय गरीब घरातला असून त्याचे वडील मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परीस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडील व एक लहान भाऊ राहत  हा घरातील मोठा होता व याच्याकडून त्याच्या आई वडिलांची बरीच स्वप्न होती.


त्याच्या मृत्यूची बातमी खासदार राजन विचारे यांना कळताच त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी व मदत व पुनर्वसन सचिव यांना पत्र लिहून आणि वैयक्तिक भेटून या विषयाबद्दल तातडीने निर्णय घेण्यासाठी आग्रही राहिले. त्याच अनुषंगाने शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली. यात कु. सुप्रियन सचिन भंडारी याच्या वडिलांना दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी रुपये ४ लाख इतक्या रकमेचा धनादेश मीरा भाईंदरच्या तहसीलदारांमार्फत सुपूर्द करण्यात आला. या मदतीसाठी तसेच पाठ्पुराव्याबद्दल भंडारी कुटुंबीयांनी खासदार राजन विचारे यांचे आभार मानले. 


खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याला यश खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याला यश Reviewed by News1 Marathi on November 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोनगांव ग्राम पंचायतीने जन आंदोलनाचा ईशारा देताच एम,आय,डीसी विभागा कडून पाणी पुरवठा सुरळीत

भिवंडी दि.६ (प्रतिनिधी  ) गेल्या वर्षभरापासून कोनगावला एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यातच कोवि...

Post AD

home ads