युवा सेनेच्या विभागीय सचिव पदी ओंकार चव्हाण यांची निवड
चिपळूण | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील कुंभवली येथील कु. ओंकार अरविंद चव्हाण यांची युवासेनेच्या विभाग सचिवपदी नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल लोटे जिल्हा परिषद गटातून ओंमकार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लोटे जिल्हा परिषद गट सदस्य अरविंद चव्हाण यांचे सुपुत्र आहेत.
खेड तालुक्यातील कुंभवली येथील सध्या लोटे जिल्हा परिषद गटाचे सदस्य असलेले अरविंद चव्हाण हे गेली काही वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून लोटे जिल्हा परिषद विभागप्रमुख यासह ग्रुप ग्रामपंचायत काडवली-कुंभवली ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच यासह अनेक पदे भूषवली आहेत.
आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शिक्षणानंतर राजकीय क्षेत्रात ओंकार यांनी पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. नुकतेच खेड येथे झालेल्या युवा सेनेच्या मेळाव्यात ओंकार चव्हाण यांची विभागीय सचिव पदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र निकेतन पाटणे यांनी ओंमकार यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी आ. भास्कर जाधव, आ. योगेश कदम, माजी आ. सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, खेडचे सभापती विजय कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत चव्हाण, अरविंद चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, राजेंद्र आंब्रे, खेड पंचायत समिती उपसभापती जीवन आंब्रे, युवा सेनेचे श्री लोटणकर, माजी युवा सेना जिल्हाप्रमुख निकेतन पाटणे, विद्यमान जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
या निवडीबद्दल ओकार चव्हाण यांनी वरिष्ठांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Post a Comment