Header AD

ईजोहरीची मुथूट गोल्ड बुलियन कॉर्पोरेशनसह भागीदारी
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२० : ज्वेलरी खरेदीसाठी भारतातील पहिले, सर्वात मोठे आणि विविध खरेदीचे पर्याय उपलब्ध असलेले मार्केटप्लेस, ईजोहरीने त्याच्या विस्तारीत ज्वेलर नेटवर्कमध्ये सोन्याचा आणखी एक प्रकार समाविष्ट केला आहे. ब्रँडने ज्वेलर पार्टनर म्हणून मुथूट ग्रुपचा भाग मुथूट गोल्ड बुलियन कॉर्पोरेशन (एमजीबीसी) भागीदारी केली. ग्राहकांच्या दागिन्यांबाबतच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एक छत्री समाधान प्रदान करण्याच्या वचनबद्धतेचा दाखला म्हणजे ही भागीदारी होय.


ईजोहरीचे सहसंस्थापक आणि सीईओ जितंद्र सिंग म्हणाले, 'सोन्याच्या व्यवसायातील सर्वात प्रसिद्ध कंपनी असलेल्या मुथूटसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या दागिन्यांच्या नेटवर्कमध्ये यामुळे आणखी चकाकी येईल. या भागीदारीअंतर्गत मुथूटची २४ के सोन्याची नाणी आणि ९९९ शुद्धता एमएमटीसी-पंप प्रमाणित कॉइन कम पेंडंट आता ज्वेलरी प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. वस्तूच्या वजनानुसार विविध किंमतीवर ते उपलब्ध आहेत.


बुलियन्स हे प्रत्यक्ष सोन्यातील अत्यंत मौल्यवान स्वरुप आहे (इंगॉट्स, विशेष नाणी किंवा बार) हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. सरकार किंवा वैयक्तिक स्वरुपात यात गुंतवणूक केली जाते. उत्सवाच्या शुभ प्रसंगी, लोक गुंतवणूक किंवा भेटवस्तूच्या स्वरुपात सोने खरेदी करत असल्याने पिवळ्या धातूच्या विक्रीत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भागीदारीबद्दलची नवी घोषणा करण्यात आली आहे.

ईजोहरीची मुथूट गोल्ड बुलियन कॉर्पोरेशनसह भागीदारी ईजोहरीची मुथूट गोल्ड बुलियन कॉर्पोरेशनसह भागीदारी Reviewed by News1 Marathi on November 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads