Header AD

भाजपाचे ठाण्यात सोमवारी 'वीज बिलांची होळी' आंदोलन निरंजन डावखरे यांची माहिती
ठाणे,  प्रतिनिधी  :  ऐन लॉकडाऊनच्या काळात आकारलेल्या भरमसाठ वीज बिलांमध्ये महाविकास आघाडी सरकारने सवलत नाकारल्यामुळे, भाजपातर्फे वीजबिलांची होळी आंदोलन करण्यात येणार आहे. वागळे इस्टेट येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणाऱ्या आंदोलनाद्वारे सत्तेच्या धुंदीतून महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यात येईल, अशी माहिती भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिली.


लॉकडाऊनमध्ये आर्थिक तणावाखाली असलेल्या जनतेला महाविकास आघाडी सरकारने मोठ्या वीजबिलांचा शॉक दिला. याबाबत जनआक्रोश निर्माण झाल्यानंतर सवलत देण्याचे सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले. मात्र, आता ऊर्जा मंत्र्यांनीच वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नसल्याचे जाहीर केले असून, महावितरणकडून सक्तीने वीज बिले वसूल केली जाणार आहेत.


महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून, या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून जनतेला सवलत देण्यासाठी भाग पाडण्यासाठी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच वाढत्या वीजबिलांचा फटका बसलेल्या नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे. महावितरणच्या मुख्य कार्यालयाबाहेरील कार्यक्रमाबरोबरच भाजपाच्या शहरातील ११ मंडलांमध्येही वीज बिलांची होळी केली जाणार आहे.

भाजपाचे ठाण्यात सोमवारी 'वीज बिलांची होळी' आंदोलन निरंजन डावखरे यांची माहिती भाजपाचे ठाण्यात सोमवारी 'वीज बिलांची होळी' आंदोलन निरंजन डावखरे यांची माहिती Reviewed by News1 Marathi on November 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads