Header AD

भिवंडीत भाजपा वाहतूक सेना शहराध्यक्ष खालिद खान कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत दाखल

 
भिवंडी , प्रतिनिधी  :  वाहुतूक सेना भिवंडीत  भाजप वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष खालिद इरफान खान यांनी भाजपला सोडचिट्ठी देऊन आपल्या शेकडो रिक्षाचालक आणि समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.यावेळी खालिद इरफान म्हणाले की भिवंडीचे रिक्षा चालक हाजी अराफत मनसे सोबत होते त्यावेळी हाजी अराफत यांनी मनसे सोडली आणि भिवंडीचे रिक्षा चालक त्यांच्या सोबत राहिले असे असताना त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.त्यानंतर त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.शेकडो मुस्लिम, हिंदू रिक्षाचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.भिवंडीतील रिक्षाचालकांचे नेहमीच शोषण केले जाते.परंतू पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने त्यांचे समर्थन केले नाही.ट्रॅफिक पोलिस ऑटोचा फोटो काढतात आणि गुन्हा दाखल करतात.ड्रायव्हरला त्याच्यावर केस असल्याची माहिती देखील नसते.त्याला अनेक अडचणी आहेत. भिवंडी सपाचे आमदार रईस शेख यांनी निवडणुकीच्यावेळी रिक्षाचालकांना मोठी आश्वासने दिली होती पण आजपर्यंत ती आश्वासने पूर्ण झालेली नाहीत.राष्ट्रवादी कॉंग्रेस रिक्षाचालकांच्या समस्या मार्गी लावेल असा विश्वास खालिद इरफान यांनी व्यक्त केला.यावेळी भिवंडी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व रिक्षाचालकांचे स्वागत केले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नेहमी रिक्षाचालकांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे आश्वासन दिले.त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच पोलिस व पालिकेत एक शिष्टमंडळ स्थापन केले जाईल.ते  प्रशासनाला भेटून प्रश्न मार्गी लावतील. यावेळी भिवंडी शहराध्यक्ष भगवान टावरे, ज्येष्ठ नेते यासीन मोमीन, युवाध्यक्ष आसिफ खान, कामगार सेलचे अध्यक्ष गयासुद्दीन अन्सारी, युसुफ सोलापुरी आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी राष्ट्रवादी शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी खालिद इरफान खान यांची भिवंडी शहर वाहतूक सेनेच्या  अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.
भिवंडीत भाजपा वाहतूक सेना शहराध्यक्ष खालिद खान कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत दाखल भिवंडीत भाजपा वाहतूक सेना शहराध्यक्ष खालिद खान कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत दाखल Reviewed by News1 Marathi on November 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत २२५ नवे रुग्ण तर १८ मृत्यू ५२८ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   २२५  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ ता...

Post AD

home ads