Header AD

बालदिनी विद्यार्थ्यांनी आली शाळेची आठवण ब्रेनली

 मुंबई, २६ नोव्हेंबर २०२० : दरवर्षी बालदिनानिमित्त देशभरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात विद्यार्थ्यांचा ही उत्स्फूर्त सहभाग असतो. परंतु देशभरात कोरोना महामारीच्या वाढत्या प्रभावामूळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना यावर्षी हा विशेष दिवस शाळेत साजरा करता आला नाही याची खंत विद्यार्थ्यांना वाटत असल्याचे ब्रेनली या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी जगात सर्वात मोठा ऑनलाइन लर्निंग मंचाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. बालदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शाळेची आठवण आली का हे जाणून घेण्याचा उद्देश या सर्वेक्षणामागे होता.


या सर्वेक्षणात १६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि प्रत्येकाने आपल्यासाठी हा दिवस खूप स्पेशल असल्याचे आणि आपण शाळेला यानिमित्ताने मिस केल्याचे नमूद केले.  ५५.३ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांच्या शाळांनी बालदिनानिमित्ताने व्हर्च्युअल कार्यक्रमांचे आयोजन केले होते.  तर ४४.७ टक्के विद्यार्थ्यांनी असा कोणताही कार्यक्रम शाळेद्वारे आयोजित केला गेला नसल्याचे सांगितले. सर्वेक्षणात सहभागी विद्यार्थ्यांपैकी ८० टक्के विद्यार्थ्यांना बालदिन साजरा करण्यामागचा उद्देश माहित असल्याचे देखील या अभ्यासातून निदर्शनास आले.


ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसानी म्हणाले, “ विद्यार्थी बालदिनी एकत्र येत असल्याने हा दिवस त्यांच्यासाठी विशेष असतो. या दिवशी त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते. या वर्षी या दिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये मात्र खूप फरक पडला. शाळा अजूनही बंद आहेत तसेच त्यांचे मनोरंजन करणा-या अॅक्टिव्हिटिजमध्ये विद्यार्थी भाग घेऊ शकत नाहीत. या सर्वेक्षणातून एक लक्षणीय ट्रेंड दिसून आला तो म्हणजे गेट टूगेदर्स नाहीत, शाळेत एकत्र जमलो नाहीत, तरी अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम ऑनलाइन सुरु असून मित्रांशी डिजिटल पद्धतीने संवाद साधता येत असल्यामुळे आनंद वाटत आहे."


दरम्यान अनेक विद्यार्थी ऑफलाइन क्लासेस सुरु होण्याबाबत फार इच्छुक नाहीत. फक्त ४७.४% विद्यार्थ्यांनी शाळा सुरु होण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. २९.४% विद्यार्थी हे निश्चित करू शकले नाहीत की, त्यांना पुन्हा शाळेत जायचे आहे की ऑनलाइन क्लासेसद्वारे त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. उर्वरीत २३.२% विद्यार्थ्यांनी म्हटले की, सध्याच्या शिक्षण पद्धतीबाबत ते समाधानी आहेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार, वेगवान इंटरनेट प्रवेश आणि ऑनलाइन लर्निंग अॅपच्या येण्यामुळे परिदृश्यातील हा बदल दिसून येत आहे.

बालदिनी विद्यार्थ्यांनी आली शाळेची आठवण ब्रेनली बालदिनी विद्यार्थ्यांनी आली शाळेची आठवण ब्रेनली Reviewed by News1 Marathi on November 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

जिवलग मित्र परिवाराने भरली गरीब विद्यार्थांची वार्षिक फी

  डोंबिवली ( शंकर जाधव )   जिवलग मित्र परिवार डोंबिवली एमआयडीसी पूर्व च्या वतीने   ९   गरजू  विद्यार्थांची  वार्षिक फी भरुन सामजिक   बांधिलक...

Post AD

home ads