Header AD

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची कोरोनावर मात गौतम सोनवणे

 

 

रविवारी ना.रामदास आठवले घरी परतणार असल्याने रिपाइं कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करणार...


मुंबई, दि. 7 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी कोरोनावर मात केली असून त्यांची प्रकृती चांगली झाली आहे. उद्या रविवार दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता  ना. रामदास आठवले रुग्णालयातून घरी परतणार आहेत.  संघर्षनायक बहुजनांचे  लोकनेते ना. रामदास आठवले यांनी कोरोनावर मात केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन स्वागत करीत रिपाइं कार्यकर्ते उत्स्फूर्त आनंदोत्सव साजरा करणार असल्याची माहिती रिपाइं चे मुंबई  अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे. 


केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी  दि. 20 फेब्रुवारी रोजी गो कोरोना चा नारा दिला होता. त्यांनी दिलेला गो कोरोनाचा नारा जगभर लोकप्रिय नारा  ठरला आहे. आजही कोरोना विरुद्ध लढण्यास गो कोरोनाचा नारा प्रेरणादायी ठरत आहे. मात्र गो कोरोनाचा नारा देणाऱ्या ना रामदास आठवले यांनाच कोरोना ने घेरले. दि. 27 ऑक्टोबर ला ना रामदास आठवले यांचा  कोरोनाचा चाचणीचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 


तेंव्हा पासून ते खाजगी  रुग्णालयात दाखल होते. 11 दिवस यशस्वी उपचार करून कोरोनावर ना रामदास आठवले यांनी  मात केली आहे. उद्या रविवार दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ना.रामदास आठवले बांद्रा येथील संविधान निवासस्थानी परतणार आहेत. कोरोनावर आपल्या नेत्याने मात  केल्याचा आणि त्यांची प्रकृती ठणठणीत चांगली असल्याचा आनंद रिपाइं कार्यकर्ते स्वयंस्फूर्तपणे साजरा करतील अशी माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे. 
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची कोरोनावर मात गौतम सोनवणे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची कोरोनावर मात गौतम सोनवणे Reviewed by News1 Marathi on November 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads