Header AD

२०२०मध्ये मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान ५ गोष्टी लक्षात ठेवा
देशभरातील लोक दिवाळीचा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. गुंतवणुकीचा विचार केल्यास, अनेक गुंतवणूकदारा मुहूर्तच्या विशेष प्रसंगी नव्या गुंतवणुकीस सुरुवात करतात. हिंदू चंद्राच्या दिनदर्शिकेनुसार हे शुभ मानले जाते, कारण ते सणासुदीच्या काळात करतात. नशीब, भरभराट आणि लक्ष्मी या देवीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ते बहुतेकदा सोन्यात गुंतवणूक करतात.

बीएसई आणि एनएसई दिवाळीच्या मुहूर्त व्यापार वेळेचे आयोजन करणार आहेत. ही परंपरा ५० च्या दशकापासून पाळली जात आहे. या दिवाळीत गुंतवणूकदार पुन्हा एकदा मुहूर्त ट्रेडिंग सत्राची तयारी करीत आहेत आणि त्यात पैसा ठेवण्यापूर्वी त्यांनी काही टिप्स विचारात घेणे योग्य आहे. व्यापा-यांनी गुंतविलेल्या टोकनच्या रकमेमुळे दिवाळीच्या दिवशी बाजारपेठेला चालना मिळते. या घटकाची तयारी करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्टॅटजिस्ट-डीव्हीपी श्री. ज्योती रॉय.


दमदार व्यवसाय मॉडेल असलेल्या कंपन्यांमध्ये खरेदी करणे: अनेक नव्या गुंतवणूकदारांना दिवाळीपासून शेअर बाजारातील प्रवास सुरू करण्याची उत्सुकता आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठीही ते उत्सुक आहेत, मात्र घाईत निर्णय घेण्यापेक्षा दीर्घकालीन योजनांसाठी खबरदारीने केलेला विचार फायद्याचा ठरू शकतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दमदार महसूल आणि व्यावसायाचे मॉडेल दर्शवणाऱ्या कंपन्यांचे स्टॉक्स चांगले असतात, असे आर्थिक सल्लागारांचे मत आहे.

स्टॉक खरेदीद्वारे भांडवलाचा विचार करून गुंतवणूकदारांना फायदा होईल, असा त्यांचा सल्ला असतो. मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान बाजारात भांडवलाचा ओघ अचानक वाढल्यामुळे अल्पावधीत नफा मिळू शकतो. तथापि, या ठिकाणी दीर्घकाळ टिकून राहण्यात स्वारस्य असल्यास भक्कम कंपन्यांची कामगिरी समजून घेतल्याने भविष्यात चांगला परतावा मिळेल.


सध्याच्या काळात अडचणी दर्शवणाऱ्या कंपन्या टाळा: अल्पकालीन मुहूर्ताच्या तासात तरी संकटग्रस्त किंवा बाजारात चढ-उता र अनुभवणा-या कंपन्यांपासून दूर राहणे चांगले. अनेकदा असे होते की, भरपूर कार्यक्षमता असलेल्या कंपन्यादेखील त्यांच्या व्यावसायिक मॉडेलमुळे किंवा आघाडीवरील कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या उणीवांमुळे अडचणीत सापडतात. या काळात नामांकित कंपन्यांना बाजूला ठेवण्यात आव्हान आहे. कारण त्यांच्या कामगिरीत अनिश्चितता असून स्टॉक्समध्येही जास्त जोखीम दिसून येते. आणखी एक पर्याय म्हणजे, संसाधन खर्च करण्याच्या पूर्वनियोजित प्लॅन करणे. त्यामुळे मुहू्त ट्रेडिंग सत्रात गुंतवणूक करताना आश्चर्याचे धक्के बसणार नाहीत.


विविध क्षेत्रातील पोर्टिफोलिओत खरेदी करा: हा सल्ला मुहूर्त ट्रेडिंगनंतरही उपयुक्त ठरू शकतो. दिवाळीत गुंतवणूक करा किंवा नका करू, नवीन किंवा जुन्या गुंतवणुकदारांना पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्याचा सल्ला हा नेहमीच उपयोगी ठरतो. त्यानंतरच्या वर्षांमध्ये बाजारात गुंतवणूक ठेवायची असेल तर हा सल्ला अधिक व्यवहार्य ठरू शकतो. किरकोळ गुंतवणूकदारांना जोखीम कमी करण्यास आणि बाजार अस्थिर असेल तेव्हा नफा आणि नुकसान शिलकीत ठेवण्यास मदत होते. एकूणच, बाजारातील जोखिमीचे व्यवस्थापन करताना, मालमत्ता वर्गात गुंतवणूक करणे आणि आर्थिक मंदीच्या काळातील नुकसान कमी करणे आवश्यक आहे.


तुमच्या पोर्टफोलिओत वृद्धी आणि मौल्यवान स्टॉक्सचे मिश्रण असावे: एखाद्याच्या मालमत्ता वर्ग आणि क्षेत्रातील पोर्टफोलिओत वैविध्य आणण्याच्या सामान्य कल्पनेपलिकडे सर्व स्टॉक्स एकाच ठिकाणी घेणे टाळावे. स्टॉक्समध्ये वैविध्य आणल्यामुळे वृद्धी होणा-या स्टॉक्सची भविष्यकालीन गती पाहता त्यात गुंतवणूक करणे चांगले असते.

तर दुसरीकडे, कमी किंमतीमुळे दिलेल्या मुहूर्तावर काही स्टॉक्स खरेदी करणे सोपे असते. कारण त्यांच्याकडे उत्तम परताव्यांचे आश्वासनही असते. पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप्स आणि मिड कॅप स्टॉक्स असणे आवश्यक आहे. मात्र पूर्ण जोखिमीचे मूल्यांकन केल्यानंतरच ते विकत घ्यावेत. तसेच गुंतवणुकदार इक्विटी एक्सपोजरबाबत सजग असले पाहिजेत. त्यांचे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे आणि मालमत्ता वाटपाबाबत इक्विटीची सुनिश्चिती करणे आवश्यक आहे.


सेक्टर्स आणि शेअर्स पाहून घ्यावेत: पुढील विचार करताना, व्यापक बाजारपेठ ही बेंचमार्कच्या तुलनेत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. व्यापक बाजारपेठेत २०२२ वित्तीय वर्षाासाठी चक्रीय गुंतवणूक केल्याने सुधारणा होतील. दरम्यान, विविध सुधारणेचे वेगवेगळे मार्ग असल्याने विविध क्षेत्रात असमान सुधारणा होईल, असा अंदाज आहे. चक्रीय क्षेत्रात, आम्ही वाहन, सिमेंट आणि कमी तिकीट कंझ्युमर ड्युरेबल्सबाबत सकारात्मक आहेत. कारण मागणी जास्त गतीने वाढेल व भरपूर प्रमाणात राहील, असा अंदाज आहे. महसूल स्पष्ट दिसत असलेल्या क्षेत्राचीही चांगली कामगिरी असेल. अॅग्रोकेमिकल्स, रसायने, दुचाकीी, आयटी आणि फार्मा यांच्यासह ट्रॅक्टर क्षेत्रालाही जोरदार गती येईल, अशी अपेक्षा आहे.

उपरोक्त उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये एचसीएल टेक्नोलॉजीज, मेट्रोपोलिस हेल्थकेअर, हॉकिन्स कूकर्स आणि गॅलेक्सी सर्फॅक्टंट्स हे सर्वोच्च निवड करण्यायोग्य आहेत. त्यांचे बिझनेस मॉडेल मजबूत असून महसूलदेखील लाभकारक असण्याचा अंदाज आहे.

२०२०मध्ये मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान ५ गोष्टी लक्षात ठेवा २०२०मध्ये मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान ५ गोष्टी लक्षात ठेवा Reviewed by News1 Marathi on November 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads