Header AD

भाजपा प्रदेश सचिवांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

 भिवंडी , प्रतिनिधी  : भाजपचे प्रदेश सचिव दयानंद चोरघे यांनी भारतीय जनता पार्टीमधील अंतर्गत गटबाजीला वैतागुन अखेर भाजपला रामराम ठोकत आपल्या प्रदेश सचिव पदाबरोबरच भाजप सदस्यत्वाचा देखील राजीनामा मागील तीन दिवसांपूर्वी दिला होता . बुधवारी चोरघे यांच्या सह   भाजप ठाणे, पालघर विभागीय जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम चौधरी यांनी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चौव्हाण ,मंत्री विश्वजीत कदम, मंत्री यशोमती ठाकुर, आमदार भाई जगताप, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आणखी वाढणार असून भविष्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार आहोत अशी प्रतिक्रिया दयानंद चोरघे यांनी दिली आहे . 

भाजपा प्रदेश सचिवांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश भाजपा प्रदेश सचिवांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश Reviewed by News1 Marathi on November 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads