Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५२ हजार पार १३३ नवे रुग्ण तर १ मृत्यू


■५२,०५६ एकूण रुग्ण तर १०३१ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १५५ रुग्णांना डिस्चार्ज.

 


कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ५२ हजार पार गेली असून आज नव्या १३३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या १३३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५२,०५६     झाली आहे. यामध्ये १०८१ रुग्ण उपचार घेत असून ४९,९४४  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- २२कल्याण प – ३७डोंबिवली पूर्व – ३४डोंबिवली प – ३२, मांडा टिटवाळा – ६ तर मोहना येथील २ रूग्णांचा समावेश आहे. 

 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९ रुग्ण टाटा आमंत्रामधून७ रुग्ण ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ७ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून, ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर मधून  व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५२ हजार पार १३३ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५२ हजार पार १३३ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads