Header AD

२५६निरंकारी भक्तांचे सेवा भावनेने रक्तदान

 कल्याण, कुणाल म्हात्रे  : कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीत रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या वतीने अनलॉक फेज़ सुरु झाल्यापासून सतत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात असून रविवारी भाईंदर व कामराज नगरघाटकोपर येथील संत निरंकारी सत्संग भवनांमध्ये दोन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या दोन शिबिरांमध्ये अनुक्रमे १५७ आणि ९९ निरंकारी भक्तांनी  नर सेवानारायण पूजा या भावनेने मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.


      भाईंदर येथील शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढीने १५७ युनिट तर नायर हॉस्पिटलच्या रक्तपेढीने ९९ युनिट रक्त संकलित केले.  कामराज नगर येथील शिबिरामध्ये जे.जे.हॉस्पिटलच्या रक्तपेढीने संपूर्ण रक्त संकलित केले. भाईंदर येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक प्रविण पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी निष्काम सेवा कार्याचे कौतुक केले. यावेळी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक हिम्मतभाई यांच्यासह सेवादल अधिकारी व अन्य सेवादार भक्त उपस्थित होते.


दोन्ही शिबिरांच्या दरम्यान कोविड-१९ च्या संदर्भात प्रशासनाकडून जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक यांनी संत निरंकारी सेवादल आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने शिबिरासाठी उचित प्रबंध व्यवस्था केली.

२५६निरंकारी भक्तांचे सेवा भावनेने रक्तदान २५६निरंकारी भक्तांचे सेवा भावनेने रक्तदान Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads