भातशेतीचे नुकसान भरपाई देण्याची कुणबी सेनेची मागणी
भिवंडी, प्रतिनिधी : परतीच्या पावसामुळे भिवंडी तालुक्यातील हजारो एकर मध्ये लागवड झालेल्यां भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी भिवंडीचे तहसीदार अधिक पाटील यांच्या कडे लेखी निवेदन देऊन केली आहे.यावेळी जिल्हा प्रमुख शरद पाटील,तालुका प्रमुख भगवान सांबरे,उपतालुका प्रमुख संतोष कथोरे,रमेश शेलार,वासुदेव पाटोळे,नरेंद्र पाटील,केशव पाटील,शाम दुपारे,विपुल पाटील,गुरुनाथ शेलार,दिनेश पाटील,कृष्णा पाटील,राजेंद्र विशे,प्रकाश फापे इत्यादी कुणबी सेना इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
भातशेतीचे नुकसान भरपाई देण्याची कुणबी सेनेची मागणी
Reviewed by News1 Marathi
on
November 05, 2020
Rating:

Post a Comment