४०मीटर बॉयलरची वाहतूक करणारा ट्रेलर पडला बंद ट्रेलरमुळे गोविंदवाडी बायपासवरील एक मार्गिका बंद
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यानजीक असलेल्या गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या सुरवातीलाच ४० मीटर बॉयलरची वाहतूक करणारा ट्रेलर बंद पडल्याने या ट्रेलरमुळे गोविंदवाडी बायपासवरील एक मार्गिका बंद झाली आहे.
मुरबाडहून उरण येथील जे.एन.पी.टी बंदरात जाणारा महाकाय ४० मीटर बॉयलरची वाहतूक करणारा ट्रेलर सोमवारी मध्यरात्री ट्रेलरचे एक्सेल तुटल्याने गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या सुरवातीलाच बंद पडला. यामुळे येथील पत्रीपुलाच्या दिशेने जाणारी एक मार्गिका बंद झाली आहे. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. अवजड वाहनांना गोविंदवाडी बायपास या रस्त्यावर बंदी असतांना देखील या रस्त्यावरून सर्रासपणे अवजड वाहने जात असतात. या अवजड वाहनांकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Post a Comment