Header AD

भिवंडीत २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना चिमुरडीने वाढदिवसा निमित्त वाहिली आदरांजली


भिवंडी ,  प्रतिनिधी  :   शिवसेना युवासेनेचे उपतालुकाप्रमुख तथा समाजसेवक कल्पेश भारत केणे यांनी सामाजिक संदेश देत आपली मुलगी विरा कल्पेश केणे हिचा ५ वा वाढदिवस २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व जवानांना अभिवादन करून साजरा केला.


यावेळी २६/११ च्या दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या पोलिस अधिकारी व जवानांना आदरांजली अर्पण करून भिवंडी पोलिस ठाण्याच्याच्या सर्व पोलिसांचे मनोधर्य वाढावे यासाठी पोलिसांना गुलाबाची फुले व मास्क वाटप केले तसेच २६ बिसलेरी पाण्याचे बॉक्स उपलब्ध करण्यात आले.यावेळी पोलिसांकडून विराचे अभिनंदन करण्यात येऊन तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी विराचे वडील कल्पेश केणे,काका राजेशकेणे व समाजसेवक सुनील केणे व विग्नेश केणे उपस्थित होते.
भिवंडीत २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना चिमुरडीने वाढदिवसा निमित्त वाहिली आदरांजली भिवंडीत २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना चिमुरडीने वाढदिवसा निमित्त वाहिली आदरांजली Reviewed by News1 Marathi on November 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads