Header AD

वालधुनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी महिनाअखेरीस सुटणार एफ केबिन रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण
कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्वेतील एफ केबिन रस्त्याचे काम सुरु असल्याने वालधुनी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून या माहिनाअखेरीस या रस्त्याचे काम पूर्ण होऊन नागरिकांची या वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी यांनी दिली. या रस्त्याच्या सुरु असलेल्या कामाची कोळी यांनी पाहणी केली यावेळी त्या बोलत होत्या.


कल्याण पूर्वेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते एफ केबीन परिसरातील रस्ता साधारणपणे महिन्याभरापूर्वी काँक्रिटिकरणाच्या कामासाठी बंद करण्यात आला. आधीच पत्रीपुलाचे काम सुरू असल्याने कल्याण पूर्वेत जाण्यासाठी नागरिकांना या रस्त्याची मोठी मदत होत होती. मात्र तोही काँक्रिटिकरणाच्या कामासाठी बंद करण्यात आल्याने नागरिकांनी मोठया प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी पुढील २ महिन्यांत या रस्त्याचे काँक्रिटिकरणाचे काम पूर्ण करून हा रस्ता पुन्हा सुरू होईल अशी माहिती केडीएमसी प्रशासनाकडून देण्यात आली होती. परंतू केडीएमसीचा आतापर्यंतचा अनुभव पाहता नागरिकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. परंतु या रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून येत्या महिनाखेरीस तो पुन्हा नागरिकांच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास शहर अभियंत्यांनी यावेळी व्यक्त केला.


दरम्यान वालधुनी पुलानंतर आता स्व. आनंद दिघे पुलावरील रस्त्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडून मास्टिक असफाल्टचा प्रयोग करण्यात आला आहे. या प्रकारच्या डांबरीकरणामुळे पुलावर पुढील ३ ते ४ वर्षे तरी खड्डे पडणार नसल्याचा दावा शहर अभियंता सपना कोळी यांनी केला आहे. कल्याण  डोंबिवली शहरातील वालधुनी पुलावर दोन वर्षांपूर्वी मस्टिक असफाल्टचा प्रयोग करण्यात आला होता यानंतर दोन पावसाळ्यात या पुलावर एकही खड्डा पडला नसल्याने हा प्रयोग यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाल्याने तोच प्रयोग एफ केबिन येथील आनंद दिघे पुलावर देखील करण्यात आला आहे. 


वालधुनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी महिनाअखेरीस सुटणार एफ केबिन रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण वालधुनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी महिनाअखेरीस सुटणार एफ केबिन रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण Reviewed by News1 Marathi on November 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads