Header AD

भिवंडीत दोन हजार हेक्टर जंगलातील पक्षी वाचवण्यासाठी वनाधिकाऱ्याची गावोगावी जाऊन जनजागृतीभिवंडी , प्रतिनिधी  :  महाराष्ट्र शासनाने 5 नोव्हेंबर ते12 नोव्हेंबर 2020 पक्षी सप्ताह जाहीर केल्याने भिवंडी तालुक्यातील तब्बल दोन हजार हेक्टर जंगलातील पक्षी वाचवण्यासाठी वनअधिकारी  साहेबराव खरे हे दिवसरात्र मेहनत घेऊन प्रत्येक गावोगावी जाऊन नागरिकांना, मुलांना एकत्र करून  जंगल आणि पक्षी वाचवण्याचे धडे देत आहे त्यामुळे नागरिकही चांगला प्रतिसाद देत असून पक्षी आणि जंगल वाचवण्यासाठी आता नागरिक सुद्धा पुढाकार घेताना पाहावयास मिळत आहे. भिवंडी तालुक्यातील  दाभाड, आदिवासी पाडा, पहारे, आवळे, विश्वगड, कुशिवली, गोंड पाडा, , राऊत पाडा, खंबाला, जावईपाडा सह बहुसंख्य गाव आणि पाड्यात वनअधिकारी  साहेबराव खरे हे जाऊन सकाळ, दुपार, संध्याकाळी   सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, समाजसेवक, महिला, मुले आणि नागरिकांना एकत्र घेऊन त्यांना जंगलाचे रक्षण कसे करायचे, वणवा कसा टाळायचा, पशु पक्षांचे रक्षण कसे करायचे याची सविस्तर माहिती देऊन त्याच प्रमाणे जंगलात नेवून वनअधिकारी  साहेबराव खरे हे झाडांची माहिती, पक्षांची घरटी, पक्षांची माहिती देऊन वन्यजीव कायदा आणि पक्षी संवर्धन या विषयी जनजागृती करीत आहे.


यामध्ये नागरिकांचाही मोठा सहभाग घेत आहे महत्वाची बाब म्हणजे वनअधिकारी  साहेबराव खरे यांनी आवळे,  विश्वगड  आणि पहारे परिसरातील ओसाड झालेले डोंगरावर अकरा हजार झाडें लावून आज हे डोंगर हिरवाईने नटले आहेत, वृक्ष प्रेमी आणि पर्यावरण प्रेमी दाभाड येथील  अमोल  भोईर यांनी वनविभागा कडे जखमी अवस्थेत सापडणाऱ्या पशु पक्षांच्या  निवाऱ्यासाठी एक लोखंडी पिंजरा वनपाल किरवली यांचेकडे सुपूर्द केला.


तर शांताराम पाटील, सरपंच अनंता पाटील,  प्रमोद सुतार , दिपक भोईर, प्रल्हाद पाटील,  अंकूश पाटील, प्रगतशील शेती पुरस्कार  विजय पाटील, पोलीस पाटील  गणेश पाटील,  कुणाल पाटील यांनी विशेष सहकार्य करत .आहे तर वन परिक्षेत्र अधिकारी संजय धारावणे यांच्या मार्गदर्शनाखाली  वन अधिकारी  साहेबराव खरे यांच्यासह वनरक्षक  प्रमोद सुतार,  विष्णू आसवले हे  विशेष परिश्रम घेत असून    वाहनचालक विकास  उमतोल यांचे ही सहकार्य लाभत  आहे, वन विभागाच्या या प्रयत्नामुळे जंगल आणि  पशु पक्षी वाचवण्यास  नक्कीच यश मिळणार आहे . 
भिवंडीत दोन हजार हेक्टर जंगलातील पक्षी वाचवण्यासाठी वनाधिकाऱ्याची गावोगावी जाऊन जनजागृती भिवंडीत दोन हजार हेक्टर जंगलातील पक्षी वाचवण्यासाठी वनाधिकाऱ्याची गावोगावी जाऊन जनजागृती Reviewed by News1 Marathi on November 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads