तब्बल आठ वर्षीपुर्वी चोरीला गेलेल्या सोन्याच्या चैनी पोलिसांमुळे मिळाल्या परत
कल्याण | कुणाल म्हात्रे : कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तब्बल आठ वर्षा पुर्वी चोरीला गेलेले दागिने संबंधिताला परत मिळवून दिल्याने त्या कुटुंबाची दिवाळी पुर्वीच दिवाळी गोड झाली आहे. दागिने परत मिळाल्याने दिव्यातील रहिवाशी असलेल्या घाग कुटुंबीयांने कल्याण लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत.
दिवा येथे राहणारा संदीप घाग हा तरुण २०१२ मध्ये कामानिमित्ताने कल्याणला आला होता. तो रेल्वे ट्रॅकवरुन चालत जात असताना काही चोरट्यांनी त्याला हटकले. त्याच्या जवळील असलेल्या दोन सोन्याच्या चैन घेऊन पोबारा केला. यानंतर काही वर्षांनी पोलिसांनी संदीपला लुटणाऱ्या चोरट्यांना अटक केली. त्या चोरट्याकडून संदीपकडून चोरलेल्या सोन्याच्या चैन हस्तगत केले.
दरम्यान आता लॉकडाऊनमुळे संदीप घाग यांची नोकरी गेली. त्यात त्यांची आई आजारी आहे. त्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. या परिस्थितीत त्यांच्याकडे पैसे नाही. मात्र याच दरम्यान संदीपला कल्याण जीआरपी पोलिसांनी फोन केला. त्यावेळी पोलिसांनी संदीपला तुमचे दागिने सापडले आहे. तुम्ही घेऊन जा, असे सांगितले. हे सर्व ऐकून संदीपला आश्चर्य वाटले. ज्या घटनेला आठ वर्ष उलटून गेले आहेत. त्यामुळे ही बातमी ऐकून त्याला धक्का बसला.
कल्याण जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी लवकरात लवकर संदीपचे दागिने त्यांच्या सुपूर्द केले पाहिजे अशी सूचना संबंधित पोलीस अधिकारी रवींद्र आव्हाड यांना केली. संदीप घागने तातडीने पोलिसात भेट दिली. त्यानंतर कल्याण पोलिसांनी ७० हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या चैन त्याला परत केले. कोरोना पार्श्वभूमीवर हातात पैसे उरले नसताना संदीपला सोन्याच्या चैन परत मिळल्याने त्याच्यासाठी हा मोठा आधार निर्माण झाला आहे. त्यामुळे संदीप घाग यांच्या कुटुंबीयांनी मनापासून पोलिसांचे धन्यवाद मानले आहेत.

Post a Comment