ठाण्यात भाजपचे अनोखे रांगोळी प्रदर्शन ११ ते १५ नोव्हे पर्यत रंगावलीतुन साकारलेले अप्रतिम व्यक्तीचित्रण पाहण्याची संधी
ठाणे, प्रतिनिधी : दीपावली उत्सवाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी,ठाणे,पूर्व,कोपरी विभागातील कार्यकर्ते कृष्णा भुजबळ व कलाछंद रांगोळीकार मंडळ,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १५ नोव्हे.या कालावधीत अनोखे रांगोळी प्रदर्शन कोपरी मार्केट येथील शिवमंदिराजवळील विद्यासागर विद्यालयात आयोजीत केले आहे.बुधवारी या रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन भाजप आमदार संजय केळकर आणि भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आ.निरंजन डावखरे यांच्याहस्ते झाले.याप्रसंगी,संघटन सचिव विलास साठे,कैलास म्हात्रे,भाजप उपाध्यक्ष राजेश गाडे,ओंकार भरत चव्हाण आणि कोयरी मंडळ अध्यक्ष सिद्धेश पिंगुळकर आदी उपस्थित होते.रंगावलीतुन साकारलेला अप्रतिम व्यक्तिचित्रणाचा अविष्कार पाहण्याची संधी ठाणेकरांना उपलब्ध झाली असून हे रांगोळी प्रदर्शन सर्वासाठी विनामूल्य आहे.
ठाणे पुर्वेकडील भाजप कार्यकर्ते,समाजसेवक कृष्णा भुजबळ यांनी आयोजीत केलेल्या या रांगोळी प्रदर्शनाचा शुभारंभ बुधवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी करण्यात आला.याप्रसंगी,रांगोळी रेखाटणाऱ्या कलाछंद मंडळाच्या २० कलाकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना आ.निरंजन डावखरे यांनी,रांगोळी रेखाटणाऱ्या कलाकारांचे कौतुक करताना, दिवाळीत रांगोळीची परंपरा जपुन संस्कृतीचे जतन केल्याचे म्हटले.तर,आ.केळकर यांनीदेखील कलाछंद रांगोळीकारांच्या कलेची स्तुती करून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान,कोरोनामुळे धास्तावलेल्या नागरिकांच्या मनातील भिती दुर व्हावी,किंबहुना आजच्या पिढीला विविध राजकिय प्रभुतींची ओळख व्हावी,यासाठी छत्रपती शिवराय तसेच,धार्मिक व ख्यातनाम राजकिय व्यक्तिमत्वांची रेखाचित्र रांगोळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या कलाकारांनी केल्याचे कृष्णा भुजबळ यांनी सांगितले.

Post a Comment