बिहारमधील भाजपा यशानंतर भिवंडीत भाजपा उत्तर भारतीय मोर्चा लतर्फे जल्लोष
भिवंडी , प्रतिनिधी : बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वांचे अंदाज फोल ठरवीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी होत ,एनडीएची सत्ता पुन्हा एकदा बिहारवर राज्य करणार असल्याने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सर्वत्र आनंद साजरा करीत असताना भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर बिहार प्रकोष्टच्यावतीने भाजपच्या मुख्य मध्यवर्ती कार्यालयाबाहेर शहराध्यक्ष संतोष शेट्टी ,आमदार महेश चौघुले ,नगरसेवक निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशा वाजवीत फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून या विजयाचा आनंद साजरा केला.या जल्लोष कार्यक्रमात भाजपा उत्तर भारतीय मोर्चा , बिहार प्रकोष्टचेअध्यक्ष दीपक झा , शहर उपाध्यक्ष सत्वशिला जाधव , उत्तर भारतीय महिला मोर्चा अध्यक्षा सुनीता यादव , दक्षिण भारतीय मोर्चा अध्यक्ष मोहन कोंडा यांसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते .
बिहारमधील भाजपा यशानंतर भिवंडीत भाजपा उत्तर भारतीय मोर्चा लतर्फे जल्लोष
Reviewed by News1 Marathi
on
November 13, 2020
Rating:

Post a Comment