Header AD

राज्यात कॉंग्रेसमुळे सत्ता हे शिवसेनेने लक्षात ठेवून केडीएमसी निवडणुकीत जागावाटपाचा विचार करावा युवक कॉंग्रेस प्रभारी सोनल लक्ष्मी घाग
डोंबिवली , शंकर जाधव :  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचा विचार करत प्रत्येक पक्षाची भूमिका, कुठल्या पक्षाबरोबर आघाडी,युती करायची का स्वबळावर लढायचे याचे गणित कसे जुळविणार असा प्रश्न जनतेला पडला आहे.मात्र पालिका स्थापनेपासून फक्त अडीच वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या कॉंग्रेस –राष्ट्रवादी पक्षाला राज्यात सत्तेवर बसण्याची जशी संधी मिळाली तसे केडीएमसीच्या निवडणुकीतहि संधी मिळावी हि भूमिका आहे. मात्र यावर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जरी अद्याप निर्णय घेतला नसला तरी जिल्हापातळीवरील नेतेमंडळीनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता कॉग्रेसमुळे आली असल्याने शिवसेनेने हे लक्षात ठेऊन आगामी केडीएमसी निवडणुकीत शिवसेना- कॉंग्रेस- राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी ठरली तरी शिवसेनेने जागावाटपात कॉग्रेसला योग्य तो न्याय द्यावा असे कल्याण –डोंबिवली जिल्हा युवक कॉंग्रेस प्रभारी सोनललक्ष्मी घाग यांनी सांगितले. स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवलीत गरिबांना अन्नधान्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

      

डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवरील रोकडे बिल्डींगजवळील कॉंग्रेस कार्यालयात स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गरिबांना अन्नधान्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कल्याण –डोंबिवली जिल्हा युवक कॉंग्रेस प्रभारी सोनललक्ष्मी घाग यांच्या हस्ते गरिबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव संतोष केणे,युवक जिल्हाध्यक्ष मनिष देसले,जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर,ब्लॉक अध्यक्ष एकनाथ म्हात्रे,डोंबिवली विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष पमेश म्हात्रे,माजी नगरसेवक रवी पाटील,महिला पदाधिकारी वर्षा शिखरे, वर्षा जगताप,दीप्ती दोषी, गायत्री सेन हर्षद पुरोहित,विजय जाधव, अजय पौळकर, निशिकांत रानडे,शरद भोईर,किशोर काळण यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 


यावेळी कल्याण – डोंबिवली जिल्हा युवक कॉंग्रेस प्रभारी सोनललक्ष्मी घाग यांना केडीएमसी आगामी सार्वत्रिक निवडणुकीबाबत बोलताना म्हणाल्या,राज्यात कॉंग्रेसमुळे शिवसेना सत्तेवर आहे हे त्यांनी विसरता कामा नये.शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडी करण्याअगोदर जागावाटपाबाबत कॉंग्रेसचा विचार करावा.आज युवक कॉंग्रेस जास्त सक्रीय असून या निवडणुकीत युवक कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. तर २०२० च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दादर येथे सेवा-सेतू (वॉर रूम ) बनवले असले तरी खरच किती समस्या सुटणार हे पत्रकारांनी भाजपला विचारले पाहिजे असा टोला लगावला.तर आजचा तरुण वर्गाला कॉंग्रेस काय हे युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पटवून देणार असल्याने भविष्यात कॉंग्रेसकडे तरुण वर्ग आकर्षित होईल असेहि यावेळी घाग यांनी सांगितले.

राज्यात कॉंग्रेसमुळे सत्ता हे शिवसेनेने लक्षात ठेवून केडीएमसी निवडणुकीत जागावाटपाचा विचार करावा युवक कॉंग्रेस प्रभारी सोनल लक्ष्मी घाग राज्यात कॉंग्रेसमुळे सत्ता हे शिवसेनेने लक्षात ठेवून केडीएमसी निवडणुकीत जागावाटपाचा विचार करावा युवक कॉंग्रेस प्रभारी सोनल लक्ष्मी घाग Reviewed by News1 Marathi on November 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads