Header AD

भिवंडीहून दिल्ली, कोलकत्ता पर्यंतही रेल्वे पार्सल सेवा सुरू करणार मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांची माहिती
भिवंडी, प्रतिनिधी  :  भिवंडी रोड रेल्वे स्थानकातील पार्सल सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आता व्यावसायिकांनी मागणी केल्यास अमृतसर, कोची, अर्नाकुलम, कोलकत्ता, सिलिगुडी, दिल्ली येथेही पार्सल सेवेद्वारे माल पाठविण्याची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी आज येथे दिली. त्याचबरोबर गरजेनुसार बांगलादेशातही पार्सलद्वारे माल निर्यात करण्याबाबत विचार करता येईल, असे श्री. गोयल यांनी सांगितले.भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या मागणीनुसार रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून १ सप्टेंबरपासून पार्सल सेवा सुरू केली होती. या सेवेला व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपयांचा माल स्वस्त दराने व वेगाने पाठविता आला. या पार्श्वभूमीवर सेवेत आणखी सुधारणा करण्यासाठी व्यावसायिकांच्या सुचना व अडचणी जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांच्याबरोबर रांजणोली येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. गोयल बोलत होते. या वेळी खासदार कपिल पाटील यांचीही उपस्थिती होती.


भिवंडी रोड स्थानकातील पार्सल सेवेच्या माध्यमातून रेल्वेला चांगला नफा झाला. सध्या शालिमार, गुवाहाटी, आजरा, पाटणा येथे माल पाठविला जात आहे. त्यातून व्यावसायिकांचा वेळ व पैशांचीही बचत झाली. यापुढे व्यावसायिकांनी मागणी केल्यास, अमृतसर, कोचीन, अर्नाकुलम, कोलकत्ता, सिलीगुडी, दिल्ली येथेही पार्सल सेवा सुरू करता येईल. इतकेच नव्हे तर व्यावसायिकांना बांगलादेशला माल निर्यात करायचा असेल, तर तेथेही माल पाठविण्याचा रेल्वे विचार करेल, असे श्री. शलभ गोयल यांनी सांगितले.
भिवंडी शहराची पूर्वी मिनी मॅंचेस्टर अशी ओळख होती.मात्र, कालांतरात ती पुसली गेली. मात्र, जुनी ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी रेल्वेकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे श्री. गोयल यांनी सांगितले. 


खासदार कपिल पाटील यांच्या मागणीवरून सुरू झालेल्या पार्सल सेवेतून रेल्वेला मोठा नफा झाला. याबद्दल श्री. गोयल यांनी खासदार कपिल पाटील यांचे आभार मानले.भिवंडी रोड रेल्वे स्थानक अत्याधुनिक व सर्व सोयींयुक्त करण्याची विनंती खासदार कपिल पाटील यांनी केली. रेल्वे पार्सल सेवेमुळे भिवंडीहून गुवाहाटीला अवघ्या ५० तासांत माल पोचत आहे. यापूर्वी तो रस्त्याने पाठविण्यासाठी तब्बल २४० तास लागत होते. त्यामुळे रेल्वेची ही पार्सल सेवा नसून स्पीड पार्सल सेवा आहे, असे मत खासदार पाटील यांनी व्यक्त केले. या सेवेमुळे पर्यावरणाचे संरक्षणही होण्यास मोलाची मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


भिवंडीहून दिल्ली, कोलकत्ता पर्यंतही रेल्वे पार्सल सेवा सुरू करणार मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांची माहिती भिवंडीहून दिल्ली, कोलकत्ता पर्यंतही रेल्वे पार्सल सेवा सुरू करणार मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांची माहिती Reviewed by News1 Marathi on November 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads