Header AD

कल्याण डोंबिवलीत ९७ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

 

■५०,३७९ एकूण रुग्ण तर १००९ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १९८ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ९७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या ९७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५०,३७९ झाली आहे. यामध्ये १४२५ रुग्ण उपचार घेत असून ४,९४५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १००९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


आजच्या ९७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१५कल्याण प – २४डोंबिवली पूर्व ३५डोंबिवली प- १५मांडा टिटवाळा – ,  तर मोहना येथील एका रूग्णांचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २३ रुग्ण टाटा आमंत्रामधून९५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ३ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून तसेच ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


कल्याण डोंबिवलीत ९७ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ९७ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads