Header AD

कोरोना काळात उत्कृष्ठ काम केल्या बद्दल पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा महासभेत सत्कार
कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यकारिणीच्या शेवटच्या महासभेत पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कोरोना काळात उत्कृष्ठ काम केल्याबाबत त्‍यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपञ देवून सत्कार करण्यात आला.शेवटच्या महासभेत एकुण १७ विषय पटलावर मंजुरीसाठी होते. सदर विषयपत्रिकेवरील विषयांस मंजुरी मिळाल्यानंतर सभेस ऑनलाईन उपस्थित सदस्यांची, पदाधिकाऱ्यांची आभारपर भाषणे झाली आणि तदनंतर पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचा लोक्प्रतीनिधिनी सत्कार करून त्यांना एक सुखद धक्का दिला.


कोरोनाचा गत सहा महिन्याचा काळ हा अत्यंत तणावाचा गेला असून त्या जबाबदारी पायी कित्येक राञ झोप आली नाही, असे भावुक उद्गार आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या सत्कार समयी काढले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण डोंबिवलीतील आयएमए चे डॉक्टर्स, महापालिका अधिकारी, कर्मचारी, सर्व नगरसेवक, महापालिकेची आरोग्य यंञणा, यांनी दिवसराञ काम करून मोलाचे सहकार्य दिल्यामुळे सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येवर नियंञण ठेवण्यास हातभार लागला आहे, हे काम करत असताना माझे अनेक अधिकारी, कर्मचारी कोरोना बाधित झाले, पण तरीही आजारातुन बरे होवून कर्तव्यावर रूजू झाले. हा सन्मान माझा नाही तर संपूर्ण प्रशासनाचा आहे, असेही ते पुढे म्हणाले. कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या पालिका सदस्यांना व महापालिका कर्मचा-यांना त्यांनी आपल्या भाषणात श्रध्दांजली वाहिली.

कोरोना काळात उत्कृष्ठ काम केल्या बद्दल पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा महासभेत सत्कार कोरोना काळात उत्कृष्ठ काम केल्या बद्दल पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा महासभेत सत्कार Reviewed by News1 Marathi on November 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads