राजेंद्र पाटील यांची माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना ठाणे जिल्ह्याच्या कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड
भिवंडी , प्रतिनिधी : तालुक्यातील के.एन.टी.विद्यालयाचे लिपिक राजेंद्र रघुनाथ पाटील यांची माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना ठाणे जिल्ह्याच्या कोषाध्यक्षपदी (खजिनदार) बिनविरोध निवड करण्यात आली आहे.राजेंद्र पाटील हे भिवंडी तालुक्यातील श्रमिक मंडळ भिवंडी संस्थेच्या के एन टावरे विद्यालय जू-नांदुरखी (लाखिवली) या शाळेमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
गेली २४ वर्षं ते या शाळेत काम करत आहेत संघटनेमध्ये ते नेहमी कार्यतत्पर असतात संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चे,अधिवेशन, चर्चासत्र, मीटिंग यामध्ये ते नेहमी सक्रिय असल्याने त्यांची जिल्ह्याच्या कार्यकारणीवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.राजेंद्र पाटील या अगोदर भिवंडी तालुक्याच्या अध्यक्ष पदावर कार्यरत होते त्यांचे काम पाहूनच त्यांना जिल्हा कार्यकारणीवर घेण्यात आले आहे.राजेंद्र पाटील यांची माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या ठाणे जिल्ह्याच्या कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर तालुक्यातून व जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजेंद्र पाटील यांची माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना ठाणे जिल्ह्याच्या कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड
Reviewed by News1 Marathi
on
November 24, 2020
Rating:

Post a Comment