Header AD

कल्याण डोंबिवलीतही वाजणार तिसरी घंटा नाट्यगृहाचा भाड्यात ७५ टक्के सवलत – पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय
कल्याण, कुणाल  म्हात्रे   :  मुंबई ठाण्या पाठोपाठ कल्याण डोंबिवलीतही तिसरी घंटा वाजणार असून कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृह खुली करण्याचा निर्णय घेत या नाट्यगृहांच्या भाड्यात ७५ टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.


       कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील इतर सर्व नाटयगृहांप्रमाणेच आचार्य प्र.के. अत्रे रंगमंदिर व सावित्रीबाई फुले कलामंदिर ही दोन्ही नाटयगृहे  २३ मार्च पासून बंद ठेवण्यात आली आहेत. कोविड- १९ च्या आपत्कालिन परिस्थितीत राज्यातील सर्व नाटयगृहे बंद असल्यामुळे नाटय व्यवसायास उतरती कळा लागली होती. सदयस्थितीत राज्यशासनाने राज्यातील नाटयगृहे काही अटी/शर्तींचे पालन करुन ५० टक्के आसन क्षमतेवर सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतू दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्चअपूरा प्रेक्षकवर्ग ही बाब लक्षात घेऊन कोविड साथीचा प्रादुर्भाव सूरु असे पर्यंत नाटयगृहांच्या भाडयांमध्ये सवलत मिळावी अशी विनंती जागतिक मराठी नाटयधर्मी निर्माता संघ यांनी २३ नोव्हेंबर रोजी पत्रान्वये केली आहे.


सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता नाटय व्यवसाय व त्याअनुषंगाने त्यांच्यावर अवलंबुन असणा-या इतर संस्थाकामगार वर्ग इत्यादींचा व्यवसाय सुरु राहवा आणि मराठी नाटय संस्था कायम कार्यरत राहावी या दृष्टीकोनातून ३१ मार्च २०२१  पर्यंत रुपये ३०० रुपये  तिकिट दरांपर्यंत मुळ भाडयामध्ये ७५ टक्के सवलत देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाटयसंस्थेने नाटकाचे तिकिट दर रुपये ३००  पेक्षा जास्त आकारल्यास नियमानुसार नियमित भाडे आकारले जाणार आहे. सदरची सवलत कोविड-१९ ची महामारीची साथ लक्षात घेऊन देण्यात येणार आहे. माहे मार्च २०२१ नंतर कोविड-१९ महामारीच्या साथीच्या अनुषंगाने या सवलतीचा फेर आढावा घेवून पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. ही सवलत देतांना इतर दर पुर्वीप्रमाणे लागू राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. 

कल्याण डोंबिवलीतही वाजणार तिसरी घंटा नाट्यगृहाचा भाड्यात ७५ टक्के सवलत – पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय कल्याण डोंबिवलीतही वाजणार तिसरी घंटा नाट्यगृहाचा भाड्यात ७५ टक्के सवलत – पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय Reviewed by News1 Marathi on November 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads