Header AD

लस लवकर येऊ दे,अवघे जग कोरोना मुक्त होऊदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

पंढरपूरदि. 26  :-  कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ देअसे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री  विठ्ठलाच्या चरणी घातले.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री. पवार आणि सौ.पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते.  यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेसौ सारिका भरणेमानाचे वारकरी श्री. कवडुजी भोयरसौ कुसुमबाई भोयरनगराध्यक्षा सौ. साधना भोसले,  पार्थ पवारजय पवार आदी उपस्थित होते.              श्री. पवार म्हणाले, 'अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आलाअसे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे.  याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतोकारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद  दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रा प्रथा परंपरेनुसार होतीलअसा विश्वास आहे.            राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टीने संकटात आला आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुख: हलके करण्याची ताकद शासनाला दे अशी मागणी  श्री विठ्ठलाकडे केली असल्याची सांगून श्री.पवार म्हणाले,  श्री विठ्ठल कोरोनाचे संकट दूर करेलच अशी समस्त भाविकांप्रमाणेच माझीही श्रद्धा आहे. पण सर्व काही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. आपणा सर्वांना कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क वापरणे, गर्दी टाळणेवारंवार हात धुणे आदी गोष्टी काटेकोरपणे अंमलात आणाव्या लागतील.


            मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करुन त्यांनी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वंदन केले. या शहीद वीरांचा त्याग महाराष्ट्र नेहमी लक्षात ठेवेलयुवकांना देशासाठी लढण्याची प्रेरणा देईल, असा मला विश्वास आहेअसे ते म्हणाले. याचबरोबर त्यांनी आज असणाऱ्या संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.


             श्री.पवार यांच्या हस्ते मानाचे वारकरी श्री. कवडुजी नारायण भोयर आणि सौ. कुसुमबाई कवडुजी  भोयर (मु.डौलापूरपो.मोझरीता. हिंगणघाट जि.वर्धा)  यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने  देण्यात येणारा प्रवास सवलत पास सुपूर्त करण्यात आला.  विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या ‘दैनंदिनी 2021’ चे प्रकाशन करण्यात आले.            यावेळी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकरसंभाजी शिंदेअतुलशास्त्री भगरेशकुंतला नडगिरेपोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहियाजिल्हाधिकारी मिलींद शंभरकरमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेनिवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुखप्रांताधिकारी सचिन ढोलेमंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशीतहसिलदार  वैशाली वाघमारेगटविकास अधिकारी रवीकिरण घोडकेमुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाडएसटी महामंडळाचे दत्तात्रय चिकोर्डेसुधीर सुतार आदी उपस्थित होते.

लस लवकर येऊ दे,अवघे जग कोरोना मुक्त होऊदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे लस लवकर येऊ दे,अवघे जग कोरोना मुक्त होऊदे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे Reviewed by News1 Marathi on November 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads