Header AD

ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार

 ठाणे  | प्रतिनिधी  :  स्टेम वॉटर कंपनीकडून होणाऱ्या पाणी पुरवठा त्यांच्या अत्यावश्यक विविध दुरुस्तीच्या कामाकरिता शुक्रवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० ते शनिवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२० सकाळी ९.०० वाजेपर्यंत शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.


शुक्रवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० ते  रात्री  ९.०० वाजेपर्यंत शहरातील घोड़बंदर रोड़, पातलीपाड़ा,कासारवडवली, पवार नगर, कोठारी कम्पाऊन्ड़, आझादनगर, डोंगरीपाड़ा, वाघबीळ, ओवळा इत्यादी भागाचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद राहणार आहे. तसेच रात्री ९. ०० ते शनिवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत सिध्देवर, जॉहन्सन,    समतानगर, इनर्निटी, जेल परिसर ,ऋतुपार्क, साकेत, कळव्याचा काही भाग व मुंब्राचा काही भाग आदी  परिसराचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद राहणार आहे. 


या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. 


ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार Reviewed by News1 Marathi on November 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोनगांव ग्राम पंचायतीने जन आंदोलनाचा ईशारा देताच एम,आय,डीसी विभागा कडून पाणी पुरवठा सुरळीत

भिवंडी दि.६ (प्रतिनिधी  ) गेल्या वर्षभरापासून कोनगावला एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यातच कोवि...

Post AD

home ads