भिवंडी मनपा स्वच्छता कामगारांना मोफत घरे देण्याची मागणी
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता कर्मचारी शहराच्या स्वच्छते बाबत नियमित काळजी घेत असताना त्यांच्या साठी मोफत घरे देण्याचे दायित्व महानगरपालिकेने बाळगावे या साठी त्यांना मोफत घरे द्यावीत अशी मागणी नगरसेवक निलेश चौधरी यांनी केली आहे .विशेष म्हणजे त्यांचा हा विषय ३ डिसेंबर रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत चर्चेला घेण्यात आला आहे .
महानगरपालिकेत सुमारे २५०० सफाई कर्मचारी असून ते बहुसंख्य गरीब कुटुंबातील असून त्यांच्या साठी कोंबडपाडा ,संगमपाडा ,पद्मानगर या ठिकाणी निवास व्यवस्था आहे परंतु तेथे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून घरभाडे कपात होत असून ,तेथील निवासी इमारती अतिधोकादायक झाल्याने तेथील कर्मचारी यांना निवासाचा प्रश्न गंभीर बनला असून या कामगारांच्या निवासाची व्यवस्था महानगरपालिका कडून मोफत व्हावी अशी विनंती निलेश चौधरी यांनी सभागृहास केली आहे .दरम्यान येत्या ३ डिसेंबर रोजीच्या महासभेत लोकप्रतिनिधी व प्रशासन या मागणी संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
भिवंडी मनपा स्वच्छता कामगारांना मोफत घरे देण्याची मागणी
Reviewed by News1 Marathi
on
November 27, 2020
Rating:

Post a Comment