Header AD

ठाणे शहर, जि काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांची आढावा बैठक कोकण विभागाचे प्रभारी बी.एम.संदिप यांच्या उपस्थित पार पडलीठाणे , प्रतिनिधी : भारतातील संपूर्ण शेतकरी,कामगार, शोषितांचा आवाज पूर्ण देशभरात पोहोचवण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चालू असून काँग्रेस कार्यकर्त्यानी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणून या कार्याकडे बघितले पाहिजे असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व कोकण विभागाचे प्रभारी बी.एम.संदिप यांनी ठाण्यातील काँग्रेस आढावा बैठकीत केले.
ठाणे शहर(जिल्हा)काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांची आढावा बैठक नुकतीच वागळे इस्टेट येथील सेन्ट लाॅरेन्स स्कूल मध्ये पार पडली या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत,प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष कानडे,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे,सुमन अग्रवाल,ठाणे जिल्हा प्रभारी तारिक फारूकी,प्रदेश सचिव  मेहूल व्होरा,के.वृषाली आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले आज संपूर्ण महाराष्ट्रातील 1 कोटी 36 लाख शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला असून या शेतकरी,कामगारांवर होत असलेला अन्याय काँग्रेस पक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याचे काम आपण सर्वानी मिळून केले पाहिजे असे सांगितले.ठाणे काँग्रेस अध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांनी बोलताना सांगितले की,संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वाधिक स्वाक्षरी ठाण्यातील काँग्रेस पदाधिकारी संकलित करून आपणाकडे सूपूर्त करेल अशी ग्वाही दिली.महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे,प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले.


याप्रसंगी व्यासपिठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण,माजी जिल्हाध्यक्ष अनिल साळवी,माजी महापौर नईम खान, माजी गटनेते संजय घाडीगावकर,सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील,महिला काँग्रेस अध्यक्षा शिल्पा सोनोने,प्रदेश सदस्य राम भोसले,प्रदिप राव,राजेश जाधव,सुखदेव घोलप,डाॅ.जे.बी.यादव,मोहन तिवारी,सन्नी थाॅमस,माधुरी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे पूर्ण नियोजन स्थानिक ब्लाॅक काँग्रेस अध्यक्ष डाॅ.अभिजीत पांचाळ यांनी केले होते.

                                   

ठाणे शहर, जि काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांची आढावा बैठक कोकण विभागाचे प्रभारी बी.एम.संदिप यांच्या उपस्थित पार पडली ठाणे शहर, जि काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांची आढावा बैठक  कोकण विभागाचे प्रभारी बी.एम.संदिप यांच्या उपस्थित पार पडली Reviewed by News1 Marathi on November 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६४ हजारांचा टप्पा २१० नवे रुग्ण तर एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात  कोरोना रुग्णांनी ६४ हजारांचा टप्पा ओलांडला असून  आज   २१०  कोरोना रु...

Post AD

home ads