Header AD

वीजबिल माफीच्या फसव्या घोषणा करून महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळले संतोष शेट्टी
भिवंडी ,  प्रतिनिधी  :  कोरोना काळात सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटलेली असताना वीजबिलात सूट देण्याची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफीच्या घोषणेवरून घुमजाव करीत सर्वसामान्य नागरीकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याने सोमवारी वीज बिलांची होळी करून महाविकास आघाडी सरकारच्या दुट्टपी भूमिकेचा निषेध नोंदवला जाणार आहे अशी माहिती भाजपा भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे .


भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन केले जात आहे. भिवंडी शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जात आहे.असे असंख्य स्थलांतरीत मजूर आपली घरे बंद करून आपल्या मूळगावी गेले आहेत. त्यांच्या बंद घराचे हजारो रुपये आलेले वीजबिल हे नागरीकांना मनस्ताप देणारे आहे किमान विजबिलातील स्थिर आकार म्हणून विजबिलात आकारणी केलेली रक्कम कमी केली तरी नागरीकांना दिलासा मिळू शकतो असे मत संतोष शेट्टी यांनी व्यक्त करून महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाचा चांगलाच समाचार घेतल आहे .


या पत्रकार परिषदेस सरचिटणीस रवी सावंत,उपाध्यक्ष जियालाल गुप्ता , प्रवक्ता प्रितेश ठक्कर ,महिला शहराध्यक्ष ममता परमाणी , दक्षिण भारतीय मोर्चा अध्यक्ष मोहन कोंडा ,उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष प्रवीण मिश्रा ,कार्यालय प्रमुख नंदन गुप्ता आदी पदाधिकारी उपस्थित होते .
वीजबिल माफीच्या फसव्या घोषणा करून महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळले संतोष शेट्टी वीजबिल माफीच्या फसव्या घोषणा करून महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळले  संतोष शेट्टी Reviewed by News1 Marathi on November 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads