फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला बाधा आणणाऱ्या कुटुंबावर गुन्हा दाखल
कल्याण | कुणाल म्हात्रे : मोहने परिसरातील मुख्य रस्त्यालगतच्या फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी गेलेल्या मनपाच्या "अ" प्रभागाच्या विशेष फेरीवाला पथकावर फुटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाला कुटुंबाने कारवाईत बाधा आणित शिवगाळ करीत आधिकारी व कर्मचारी यांना धक्का बुक्की केल्याची घटना रविवारी घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.
काही दुकानदार आपल्या दुकानासमोरील पदपथांवर अतिक्रमण करतात. त्यामुळे नागरिकांना व पादाचा-यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. फेरीवाले, हातगाडीवाले तसेच पदपथावरील अतिक्रमणे यांच्याविरुध्द ठोस कारवाई करण्यासाठी प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत "विशेष फेरीवाला पथक" गठित करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी यांना दिले आहेत.
आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार "अ" प्रभाग क्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाई चा बडगा उचलला. "अ" प्रभाग क्षेत्र विशेष फेरीवाला पथक कर्मचारी रविवारी कारवाईसाठी गेले असता शंकर गुप्ता तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच वायरल झाला आहे. या प्रकारानंतर पालिका कर्मचारी देवानंद भोंगाडे यांनी शंकर गुप्ता तसेच त्यांची पत्नी, मुलावर या अनाधिकृत ठेला चालका कुटुंबा विरोधात सोमवारी सरकारी कामात अडथळा आणल्या बाबत खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment