Header AD

इमार्टिकस लर्निंगने डिजिटल मार्केटिंग करिता प्रोडिग्री कोर्स लाँच केलामुंबई, १ नोव्हेंबर २०२० : भारतातील वेगवान व्यावसायिक शिक्षण संस्था इमार्टिकस लर्निंगने डिजिटल मार्केटिंगमध्ये नवा प्रोडिग्री अभ्यासक्रम लाँच केला आहे. हा अॅप्लिकेशन-ओरिएंटेड प्रोग्राम असून डिजिटस (पब्लिसीज ग्रुप) या भारतातील सर्वात मोठ्या मार्केटिंग एजन्सीसोबत यासाठी भागीदारी करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी ही एजन्सी नॉलेज पार्टनर म्हणून काम करेल.


 

या सर्टिफाइड कोर्स क्षेत्रातील तज्ञांनी बनवला असून उद्योगांसाठी आवश्यक प्रकल्पांसाठीचा अनुभव यातून विद्यार्थ्यांना मिळेल. अत्याधुनिक अभ्यासक्रम, सध्याच्या मार्केटिंग ट्रेंडसोबत विकसित केलेला असून याद्वारे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात अनेक विकासाच्या संधी प्रदान केल्या जातील. या प्रोग्रामद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीशी सुसंगत अद्ययावत कौशल्ये शिकता येतील. तसेच सर्टिफिकेशनसह वास्तविक अनुभव देणारे इंडस्ट्री-ओरिएंटेड प्रकल्पांचाही यात समावेश असेल.


 

या क्षेत्रातील दिग्गज पॅनलचे ज्ञान आणि नियमित प्रॅक्टिकल प्रोजेक्ट याद्वारे या प्रोडिग्री कोर्समध्ये सर्वंकष आणि सुव्यवस्थित अभ्यासक्रम पुरवला जाईल. याद्वारे विद्यार्थ्यांचा सखोल दृष्टीकोन तयार होईल. हा अभ्यासक्रम क्लासरुम तसेच ऑनलाइन स्वरुपातही उपलब्ध आहे. १२० तासांच्या या अभ्यासक्रमात १० प्रमुख मोड्यूल्स असून त्यात लँडिंग पेजेस, अफिलिएट मार्केटिंग, सोशल मीडिया मार्कटिंग, अॅडव्हान्स्ड अॅनालिटिक्स आणि इतर प्रमुख अशा डिजिटल मार्केटिंग संकल्पनांचा समावेश आहे.


 

इमर्टिकस लर्निंगच्या सह संस्थापक सोन्या हूजा म्हणाल्या, "जग ऑनलाइनभोवती फिरत असताना आणि अनेक बिझनेस या व्हर्चुअल जगात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी स्पर्धा करताना, तरुण व्यावसायिकांनी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील बारकावे समजून घेण्याची आवश्यकता आहे. आमचा इंडस्ट्री-सर्टिफाइड कोर्स हा उद्योगातील ज्येष्ठ दिग्गजांनी तयार केला असून याद्वारे विद्यार्थ्यांचे अनुभव वाढतील, त्यांच्यात उच्च कौशल्ये विकसित होतील व ते भविष्यासाठी सज्ज असे व्यावसायिक व्यक्ती बनतील."


इमार्टिकस लर्निंगने डिजिटल मार्केटिंग करिता प्रोडिग्री कोर्स लाँच केला इमार्टिकस लर्निंगने डिजिटल मार्केटिंग करिता प्रोडिग्री कोर्स लाँच केला Reviewed by News1 Marathi on November 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

एमजीने सामाजिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाँच केले ‘वूमेंटॉरशिप'

मुंबई, ५ मार्च २०२१ :  सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WO...

Post AD

home ads