Header AD

भिवंडी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य वितरणभिवंडी , प्रतिनिधी  :  अवकाळी पावसाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी नुकसानभरपाई दिली जाईल हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द महाविकास आघाडीने पाळला असल्याचे प्रतिपादन आमदार शांताराम मोरे यांनी केले.ते भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात बोलत होते .या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ मिहान नळदकर ,तहसीलदार अधिक पाटील ,सह गटविकास अधिकारी अविनाश मोहिते ,कृषी अधिकारी जी एच बाबळे ,नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी आदी अधिकारी उपस्थित होते .परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना त्यांच्या मदतीसाठी सर्वत्र आक्रोश होत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 22 ऑक्टोबर रोजी भिवंडी तालुक्यातील बाधित शेतांचा बांधावर जाऊन पाहणी दौरा केला होता त्याच वेळी त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले असता त्यानंतर महसूल ,कृषी व पंचायत समिती यांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकांनी तातडीने तालुक्यातील बाधित क्षेत्रांचे पंचनामे केले ज्यामध्ये तब्बल 5800 शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दीड कोटी रुपयांची मदत तहसीलदार कार्यालयात जमा झाल्यानंतर आज प्रतिनिधीक स्वरूपात पाच शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश मान्यवरांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आले .


तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शासन सदैव तत्पर असून हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे ,शिवसेना जिल्हाप्रमुख हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली ,तर उपविभागीय कार्यालय ,तहसीलदार कार्यालय ,कृषी विभाग व पंचायत समिती येथील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी झोकून देऊन या काळात काम केल्याने या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीत आनंद साजरा करता येणार आहे अशी प्रतिक्रिया आमदार शांताराम मोरे यांनी व्यक्त केली .
तालुक्यात सुमारे 8 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यांना ही मदत दिली जाणार आहे ,उर्वरित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात नुकसानीचे पैसे दिवाळी पूर्वी जमा होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी दिली आहे .
भिवंडी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य वितरण भिवंडी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य वितरण Reviewed by News1 Marathi on November 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads