कोरोनामुळे घरे विकत घेण्यासाठी एम.सी.एच.आय.ची ऑनलाईन सुविधा वेबपोर्टल बनविणारी महाराष्ट्रातील पहिली संस्था
कल्याण , कुणाल म्हात्रे : कोरोना संकटाची झळ सर्वच क्षेत्राताला बसली असुन यात बिल्डरआणि डेव्हलपर्स क्षेत्राला देखील यांचा फटका बसला आहे. ग्राहक वर्गाला आँनलाईनमाध्यमातून कल्याण डोंबिवली क्षेत्रातील विविध प्रकल्पांची माहिती घरबसल्या मिळवूनआपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी mymchi.com या नावाने नविन पोर्टल सुविधा एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. या पोर्टलचे उद्घाटन ९ नोव्हेंबर रोजी निरंजन हिरानंदानी यांचेहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सालाबाद प्रमाणे क्रीडाई एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनीट यावर्षा देखील १० वे प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आँनलाईन माध्यमातून आयोजन करीत असुन कोवीड-१९ च्या प्रसारामुळे घर खरेदी करण्यासाठी वैयक्तीक भेट देऊन खरेदी करणे अशक्य असल्यामुळे सदर पोर्टलच्या माध्यमातुन घर खरेदीदारांना घरबसल्या घर खरेदी करता येणार आहे. या ऑनलाईन प्रदर्शनात १०० विकासकांचे १५० च्या आसपास प्रोजेक्टची माहिती मिळेल. त्यामुळे या नविन पोर्टलचाजनतेला उपयोग होईल, विकासकांच्या सर्व प्रोजेक्टची माहिती ते देत असलेल्या नविन स्कीमची माहिती एक क्लिकवर ग्राहकांना मिळेल.
शासनाने स्टॅम्पडयुटी व गृह कर्जावरील व्याजदरात कपात केल्यामुळे ग्राहकांमध्ये घर खरेदी बाबत उत्साह निर्माणझाल्याचे दिसुन येते. मागील दोन महीन्यात घर खरेदीत सुमारे ५०% पेक्षा जास्त वाढ झाल्याचे आकडे समोर आलेले आहेत. त्यामुळे mymchi.com या पोर्टलच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन सर्व ग्राहकांना, विकासकांच्या प्रकल्पाला घर खरेदी करणेबाबत सुलभता निर्माण होणार आहे. त्यामुळे यासुविधेचा नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आवाहन एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिट अध्यक्ष श्रीकांत शितोळे, माजी अध्यक्ष रवि पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
Post a Comment