Header AD

एकत्र येऊन पक्ष वाढीला हातभार लावा राजेश टोपे यांचे राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शनडोंबिवली , शंकर जाधव  : एकेकाळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत दोनच नगरसेवकावर समाधान मानावे लागले.त्यानंतर पक्षाला उभारी येणाऱ्यासाठी पक्षासाठी सदस्य नोंदणी कमी पडली. या पक्ष वाढीसाठी वरिष्ठ नेत्यांना वेळ मिळत नसल्याची कुजबुज कार्यकर्त्यामध्ये सुरु होती. मात्र आता राज्यात सत्ता आल्याने पुन्हा जोमाने उभे राहण्याची ताकद पक्षाला आल्याने कार्यकर्ते नेतेमंडळींची भाषणे ऐकण्यास गर्दी करत आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना उपाययोजना आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे कल्याणात आले होते.त्यानंतर कल्याण डोंबिवली शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची प्रमुख पदाधिकारी बैठकित टोपे यांनी एकत्र येऊन पक्ष वाढीला हातभार लावा लावा अश्या शब्दात टोपे मार्गदर्शन केले.


    यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार विद्या चव्हाण,प्रमोद हिंदुराव, डॉ.वंडार पाटील, रमेश हनुमंते, अर्जुनबुवा चौधरी यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यांनी आपल्या भाषणात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन दिले.ते म्हणाले,आपण सर्वजण परीवारासारखे आहोत.कधीकधी यात थोड्याफार प्रमाणात भांडणे होतात.परंतु सर्वांनी एकत्र येऊन कामास सुरुवात केली पाहिजे.पक्ष वाढीसाठी एकत्र या. आता राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने जनतेची कामे लवकर होतील. त्यामुळे जनतेच्या संपर्कात राहून जमेल तेवढी मदत करा, लोकांची सेवा करा.तर उपस्थित पदाधिकारी यांनी भाषणे केली.यावेळी स्थानिक पदाधिकारी राजू शिंदे,निरंजन भोसले,राजेंद्र नांदोस्कर, प्रसन्ना अचलकर,समीर भोईर,समीर गुहाटे,वल्ली राजन,विनया पाटील,यासह अनेकांनी पालिकेच्या निवडणुकीत पक्ष वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

एकत्र येऊन पक्ष वाढीला हातभार लावा राजेश टोपे यांचे राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन एकत्र येऊन पक्ष वाढीला हातभार लावा राजेश टोपे यांचे राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन Reviewed by News1 Marathi on November 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads