Header AD

शिवसेनेच्या उत्तर भारतीय सेलच्या कार्यकर्त्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात प्रवेश

 मुंबई , प्रतिनिधी  :  आगामी 2022 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा पराभव नक्की असून भाजप आरपीआय युतिचा झेंडा मुंबई मनपावर फडकेल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.  रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 


बांद्रा येथील संविधान निवासस्थानी ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शिवसेने च्या उत्तर भारतीय सेल मधील कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश झाला. त्यावेळी माध्यमांशी  ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी शिवसेना उत्तर भारतीय सेल चे उत्तर मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष रमेश संतलाल गौड; निमित्त तन्ना ; डेमियल डीसा; श्रीमती कृष्णा गुलाब गौड;आदींच्या नेतृवात शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव उपस्थित होते. 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील शिवशक्ती भीमशक्ती एकजूट आता शिवसेने ने संपुष्टात आणली आहे. त्यामुळे आगामी मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी रिपब्लिकन पक्ष भाजप युती निवडणूक मैदानात उतरेल असा निर्धार ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पूर्वीसारखी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेने सारखी राहिली नाही. त्यामुळे शिवसेना सोडून आम्ही रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. उत्तर भारतीयांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात नेहमी रिपब्लिकन पक्ष उत्तर भारतीयांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे असे मनोगत शिवसेनेतून आरपीआय मध्ये प्रवेश केलेले रमेश संतलाल गौड यांनी यावेळी व्यक्त केले. 

शिवसेनेच्या उत्तर भारतीय सेलच्या कार्यकर्त्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात प्रवेश शिवसेनेच्या उत्तर भारतीय सेलच्या कार्यकर्त्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात प्रवेश Reviewed by News1 Marathi on November 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads